आजचा दिवस
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर,फाल्गुन कृष्ण अष्टमी, शनिवार, दि. २२ मार्च २०२५, चंद्र – धनु राशीत, नक्षत्र – मूळ, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४२ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ४९ मि.
नमस्कार आज चंद्र धनु राशीत रहाणार आहे. आजचा दिवस ज्येष्ठा वर्ज्य दिवस आहे. आज रवि – चंद्र केंद्रयोग, रवि – शुक्र युतियोग, चंद्र – बुध केंद्रयोग व चंद्र – शुक्र केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कर्क व मकर या राशींना प्रतिकूल जाईल.
मेष : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसिक चिंता कमी होतील.
वृषभ : एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्यता आहे.
मिथुन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. उत्साही राहणार आहात.
कर्क : एखादी मनस्तापदायक घटना संभवते. खर्च वाढणार आहेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील.
सिंह : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. व्यवसायामध्ये तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. विविध लाभ होतील.
कन्या : मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटी वाढणार आहे. महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे.
तुळ : जिद्दीने कार्यरत राहून मनोबल वाढेल. आत्मविश्वासपूर्वक निर्णय घ्याल. अपेक्षित सुसंधी लाभणार आहे.
वृश्चिक : आर्थिक लाभ होणार आहेत. कुटुंबात सुसंवाद राहील. स्वास्थ्य लाभणार आहे.
धनु : महत्त्वाची तसेच दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. तुमचे मन आशावादी राहील. सकारात्मकपणे विचार कराल.
मकर : काहींना नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे. दिवस कंटाळवाणा जाण्याची शक्यता आहे. मनोबल कमी असणार आहे.
कुंभ : मनोबल वाढेल. विविध लाभ होतील. वरिष्ठांचे तसेच नोकरीतील सहकार्यांचे सहकार्य लाभेल. चिकाटी वाढणार आहे.
मीन : सर्वत्र तुमचा दबदबा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. उत्साहाने कार्यरत रहाल.
आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 982230305