मतदान वाढविण्यासाठी भाजप श्रेष्ठींचे चिंतन


 

मतदान वाढविण्यासाठी
भाजप श्रेष्ठींचे चिंतन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला, त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ५५ ते ६० टक्के इतकेच मतदान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षाही कमी झाले आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पट्ट्यात मतदानाचा टक्का घसरला, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची धांदल उडालेली आहे.

Advertisement

विदर्भातील नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उमेदवार आहेत, तरीही तिथे मतदान ६० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. नागपूर हा शहरी मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी मतदान कमी झालं, त्याची पुनरावृत्ती मुंबई, पुणे अशा शहरी भागांमधून होईल, अशा शक्यतेने भाजपमधील वरिष्ठ नेते गोंधळले. या परिस्थितीवर मात करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरचिटणीस बी.एल.संतोष, विनोद तावडे आणि मोजकेच प्रमुख नेते उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी देशभरातील कार्यकर्त्यांना सूचना देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले‌. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात आक्रमकता आणली असून, मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!