राशीभविष्य
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, माघ कृष्ण तृतीया, शनिवार, दि. १५ फेब्रुवारी २०२५, चंद्र – कन्या राशीत , नक्षत्र – उत्तरा, सुर्योदय- सकाळी ०७ वा. ०८ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ३८ मि.
नमस्कार आज चंद्र कन्या राशीत रहाणार आहे. आजचा दिवस सकाळी ११ पर्यंत चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र षडाष्टकयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर व मीन या राशींना अनुकूल तर मेष, तुला व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष :आरोग्य जपावे लागणार आहे. काहींना अनपेक्षितपणे एखादी समस्या जाणवेल. कामाचा ताण वाटेल. काहींना नैराश्य जाणवणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृषभ : काहींना विविध लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व उत्साही राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास होणार आहेत.
मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज आपण अत्यन्त आनंदी व आशावादी राहणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत.
कर्क : जिद्द वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना नातेवाईक भेटणार आहेत. अनपेक्षितपणे एखादा प्रवास संभवतो. प्रवास सुखकर होणार आहेत.
सिंह : कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. सकारात्मक पणे कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. कामाचा आनंद घ्याल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात.
तुला : मानसिक उद्विग्नता वाढेल. कामाचा ताण वाढेल. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. कौटुंबिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
वृश्चिक : आर्थिक कामात सुयश लाभेल. आज आपले बौध्दिक व वैचारिक परिवर्तन होईल. तुमचा अंदाज अचूक ठरणार आहेत. कामाचा ताण कमी होईल.
धनु : सार्वजनिक कार्यात सहभाग वाढणार आहे. प्रतिष्ठा व मानसन्मान लाभेल. काहींना प्रवासात विविध लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
मकर : कार्यक्षेत्र व्यापक होईल. कामाचा ताण कमी होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्दीने कार्यरत रहाल. चिकाटी वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो. आज आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करु नये, अतिताण घेऊ नये. प्रवास नकोत.
मीन : प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. सकारात्मकपणे कार्यरत रहाल. नोकरी,व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.
***
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054