भाजपाची मापे काढू नयेत: धैर्यशीलदादा कदम


कोणीही येड्या गबाळ्याने भाजपाची मापे काढू नयेत: धैर्यशीलदादा कदम

सातारा

भारतीय जनता पार्टी हा भारतातलाच नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळे कार्यकर्ते आणि नेते मिळून मिसळून काम करत असतात, विरोधकांनी आपल्या लायकीत राहावे , आणि भाजपची मापे काढण्याचा प्रयत्न करू नये, असे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले

आज एका वर्तमानपत्रात आलेल्या माहितीनुसार माण तालुक्यातील , एका ग्रामपंचायतीमधील ,एक स्वयंघोषित नेता अनिल देसाई आम्हाला शहाणपणा शिकवत आहे , त्यांनी भाजप कार्यालय, खासदार उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याबद्दल काही चुकीची वक्तव्ये केली. आमदार गोरेंमुळे भाजप बदनाम झाली, आमदार गोरे यांनी खा. उदयनराजे भोसले यांना तिकिट मिळू नये म्हणून प्रयत्न केले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर ज्यावेळी भाजप कार्यालयाला भेट दिली त्यावेळी आ. जयकुमार गोरे यांचा फोटो काढून फेकून दिला. या तिन्ही आरोपांत काहीही तथ्य नाही. ज्यांनी आरोप केला त्यांनी कोणत्या पक्षाची सुपारी घेतली हे जाहीर करावे. आमदार जयकुमार गोरे तीनवेळा आमदार झालेत. २०१९ च्या निवडणुकीत ज्यांनी त्यांच्यावर टिका केली, त्या सगळ्यांनी आमचं ठरलय म्हणून खच्चून विरोध केला.तरीही आमदार जयकुमार गोरे निवडून आले , त्यामुळे प्रसिद्धीसाठी काहीही शब्द तोंडातून काढणाऱ्या स्वयंघोषित नेत्याने , स्वतःला पडलेली मते आणि त्यांचा आवाका याचा अभ्यास करून नंतरच भारतीय जनता पार्टीला नावे ठेवावीत अन्यथा जिल्हा परिषद सोडाच त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना सातारा लोकसभेच्या निवडणुकीची उमेदवारी मिळावी आणि ते निवडून यावेत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या लहानात लहान कार्यकर्त्यापासून ते सर्व नेत्यांपर्यंत सर्वांनी एकत्र काम केले आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार सातारा लोकसभेत पहिल्यांदा निवडून यावा यासाठी प्रयत्न केले

Advertisement

आमदार जयकुमार गोरे यांचा लोकसभा मतदारसंघ जरी माढा असला तरीही त्यांनी आपली पूर्ण ताकद श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांना उमेदवारी मिळावी आणि ते निवडून यावेत यासाठी लावली होती ,सातारा जिल्ह्यात उदयनराजे भोसले यांना तिकिट मिळणार हे सगळ्यांना माहीत होते. परंतु आता विधानसभा निवडणुका आल्यानंतर भा ज पा च्या नेत्यांमध्ये भांडणे लगवित म्हणून हे विरोधक असे आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता कुठेही अशा प्रकाराला थारा देणार नाही.
उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम केले आहे. देसाई यांनी भा ज पा वर आरोप केले, त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या अनेक वेळा मागे लागून पक्षाची पदे घेतली , परंतु संघटनेसाठी काही काम केले नाही , त्यांच्या घरातील सदस्य भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत , याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा आहे, त्यामुळे स्वतःचीच लाज वाटून त्यांनी विरोधी आघाडीत काम करायला सुरुवात केली, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांना सुद्धा सर्व कार्यकर्त्यांची सर्व नेते मंडळींची पूर्ण माहिती आहे आणि सर्वजण पक्षासाठी एकत्र काम करतात याची त्यांना कल्पना आहे , उदयनराजे हे चौथ्या टर्मचे खासदार आहेत. ते राज्याचे आणि देशाचे नेतृत्व करतात. ते अशी बालबुद्धीची कृत्ये करणार नाहीत. लोकसभेतील विजयानंतर उदयनराजे भोसले यांचे भाजपच्या कार्यालयाजवळ आले. सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्या दिवशी महाराज कार्यालयात आलेच नाहीत. त्या दिवशी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा कार्यालयात जल्लोष करून लाडू वाटप करण्यात आले, दुसऱ्या दिवशी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सत्कार करायला आमदार गोरे जलमंदिरामध्ये गेले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या आडून देसाईंची भाजपावर वार करायची ही पद्धत अतीशय चुकीची आहे.
जिल्ह्यातील सर्व नेते भाजपाचे चिन्ह हेच आपला नेता मानून काम करतात. त्यामुळे कोणीही काही वल्गना केल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यावर फरक पडणार नाही. त्यांनी आधी ठरवावं की ते कोणत्या पक्षात आहेत. पातळी सोडून राजकारण करू नये व बोलू नये.

खोटे आरोप करणारे यांनी भाजपच्या नेत्यांच्या मागे लागूनच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष पद मिळवले याचीही सर्वांनाच माहिती आहे
आमदर जयकुमार गोरे ज्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन केले. सध्याही कार्यालयाची त्यावेळचीच रचना असून यात काहीही बदल केलेला नाही. एक वर्ष त्यांना अध्यक्षपदाचा कार्यकाल मिळाला. या काळात त्यांनी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत पायाला भिंगरी लावून, सर्वसामान्यांना भाजपाकडे आकृष्ट करण्याचे काम केले. त्यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपाचा दबदबा वाढला. त्यामुळे त्यांच्यामुळे कुठे बदनामी झाली असा सवाल त्यांनी कदम यांनी केला.
याचप्रमाणे जयकुमार गोरे यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीस विरोध केला असा आरोप केला. हा आरोप करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. ते पक्षाच्या कोणत्याही प्रक्रियेत नाहीत.
सातारा जिल्ह्यातील ,भारतीय जनता पार्टीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदनदादा भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सचिव भरतनाना पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील, अतुल बाबा भोसले, मनोज दादा घोरपडे , सौ प्रियाताई शिंदे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीसाठी एकत्रित काम करत आहेत, असे असताना स्वतःचा ढोंगीपणा लपवण्यासाठी भारतीय जनता पार्टीवर आरोप करणे आणि खोट्या गोष्टी पसरवणे हे उद्योग खोटारड्या महाशयांनी बंद करावेत, अन्यथा त्यांना त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा जागा दाखवण्याची तयारी भारतीय जनता पार्टीची आहे हे लक्षात ठेवावे असा इशारा भा ज पा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!