आजचा दिवस : राशिफल
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, आषाढ शुक्ल पंचमी, गुरुवार, दि. ११ जुलै २०२४, चंद्र – सिंह राशीत, नक्षत्र – पूर्वा दुपारी १ वा. ०४ मि. पर्यंत नंतर उत्तरा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. १० मि. , सुर्यास्त- सायं. १९ वा. १९ मि.
नमस्कार आज चंद्र सिंह राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र लाभयोग, रवि – शनि त्रिकोणयोग, चंद्र – मंगळ त्रिकोणयोग, चंद्र – शनि प्रतियोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन,कर्क, सिंह, वृश्चिक, तुला, वृश्चिक, धनु व कुंभ या राशींना अनुकूल तर कन्या, मकर व मीन या राशींना प्रतिकूल जाणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : सध्या आपला असणारा बौद्धिक व वैचारिक संभ्रम कमी होणार आहे. मुलामुलींची अपेक्षित प्रगती होईल. आर्थिक लाभ होणार आहेत. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आपल्याला सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : सौख्य व समाधान लाभणार आहे. तुमच्या कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. नोकरी व व्यवसायात तुम्हाला स्वास्थ्य लाभणार आहे.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना नवी दिशा सापडेल. तुम्ही आपल्या मतांवर ठाम असणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. प्रवास सुखकर होतील.
कर्क : आर्थिक कामात सुयश लाभेल. कौटुंबिक मतभेद कमी होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचे आजच्या कामाचे नियोजन योग्य ठरणार आहे. काहींना अचानक धनलाभ होईल.
सिंह : तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या महत्त्वाच्या कामांचे नियोजन अचूक ठरेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. अध्यात्मिक प्रगती होईल. मानसिक अस्वस्थतेमुळे दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.
तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे महत्त्वाचे निर्णय आज योग्य ठरणार आहेत. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल.
वृश्चिक : दैनंदिन कामे यशस्वी होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. सार्वजनिक कामात सुयश लाभणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या आजच्या कामांचे नियोजन अचूक ठरेल.
धनु : कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून आनंद मिळेल. मानसिक ताकद उत्तम राहील.
मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. दैनंदिन कामात लक्ष लागणार नाही. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. काहींना अनावश्यक खर्च करावा लागेल. मेहनत वाया जाईल.
कुंभ : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे.
मीन : मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. प्रवास शक्यतो आज नकोत. आज तुम्ही आपल्या महत्त्वाच्या कामात बारकाईने लक्ष घालावे. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे.
आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४