ना.आठवले यांची मागणी


विधानसभा निवडणुकीत १२ जागा मिळाव्यात*

-ना.रामदास आठवले यांची मागणी

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाला १० ते १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (गुरुवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. तरीही नाराज न होता महायुतीचा प्रचार केला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एक जागा मिळावी, अशी विनंती उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही केली होती. अशी माहिती आठवले यांनी दिली आणि विधानसभेच्या १२ जागांसाठी आग्रही असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या समित्यांवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सदस्यत्वाची संधी मिळावी. महामंडळांच्या संचालक पदावरही आमच्या कार्यकर्त्यांचा समावेश व्हावा, अशीही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप सरकार परत आल्यास भारतीय राज्य घटना बदलली जाईल असा अपप्रचार इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत केला. त्या आधारे दलित आणि अल्पसंख्यांकांची मते मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण, त्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही, असा दावा आठवले यांनी केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!