मनोरुग्णालयात सुधारणांसाठी  प्रयत्न करणार: खा.डॉ.कुलकर्णी


मनोरुग्णालयात सुधारणांसाठी
प्रयत्न करणार

-खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे – प्रादेशिक मनोरुग्णालयालाच्या इमारतीच्या नूतनीकरणापासून औषधांसाठी जादा निधी उपलब्ध करून देण्यापर्यंत प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा, येथे खा.कुलकर्णी यांनी बुधवारी भेट दिली. भेटीमध्ये त्यांनी रुग्णालयातील रुग्णसेवा प्रणालीची माहिती घेतली आणि डॉक्टर्स, कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली.

Advertisement

अतिशय जुन्या इमारती, नूतन अद्ययावत इमारतींची आवश्यकता, पाणी आणि ड्रेनेज व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता, आधुनिक आणि उपयुक्त व्यावसायिक शिक्षणाची गरज, वर्षानुवर्षे येथेच राहणार्‍या रुग्णांचा विचार, कुटुंबाची जबाबदारी झटकण्याची मानसिकता, लांबून येणार्‍या रुग्णांसाठी पुरेशी दीर्घ मुदतीची औषधे देण्याची क्षमता, त्यासाठी अधिक निधीची तरतूद या आणि अश्या अनेक मुद्यांवर भेटीत चर्चा झाली.

या सर्व विषयात स्वतः लक्ष घालून अडचणी सोडविण्याचे आश्वासन खा. डॉ.मेधा कुलकर्णी यांनी दिले.

यावेळी वैद्यकीय अधिक्षक सुनिल पाटील, सहाय्यक संचालक प्रशांत वाडीकर, भाऊसाहेब माने, उपअधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड, भुलरोग तज्ञ डॉ.पल्लवी तारळकर, वरिष्ठ मनोविकृती तज्ञ, डॉ. संदीप महामुनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!