एक हजार वृक्षरोपण संकल्प
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण*
*शिक्षणोत्तेजक संस्थेचा*
*शताब्दी वर्षानिमित्त*
*एक हजार वृक्षरोपण संकल्प*
पुणे – येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तजक संस्थेने शताब्दी वर्षानिमित्त १००० झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प केलेला आहे.
या संकल्पानुसार संस्थेने रविवारी दिनांक १४ जुलै रोजी नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्रातील चैतन्य विद्यालय, सु.गो.दंडवते कनिष्ठ महाविद्यालयाचे आवार आणि नरसिंह मंदिराच्या परिसरात ५० झाडांच्या वृक्षारोपणाने उपक्रमाचा प्रारंभ केला. त्यात वड, पिंपळ, चिंच औदुंबर, रक्तचंदन आदी झाडांचा समावेश आहे. या झाडांचे संगोपन शिक्षक उत्तरेश्वर पवळ यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. त्यांनी स्वतः ही जबाबदारी स्वीकारली आहे.
याप्रसंगी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष जयंत देशपांडे, विश्वस्त डॉक्टर प्रशांत सुरू, मुख्य चिटणीस सुनील पारखी, चिटणीस चंद्रशेखर कुलकर्णी, सहचिटणीस अनिल पानसे, प्रशालेचे प्राचार्य गोरख लोखंडे, शिक्षण प्रसारक मंडळ नीरा नरसिंहपूर यांचे कार्याध्यक्ष अभयजी वांकर, डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी, चैतन्य विद्यालयाचे माजी प्राचार्य दुनाखे, ग्रीन आर्मी, वृक्ष संवर्धन व लागवड विभागाचे प्रमुख नंदकुमार पाटील आदी उपस्थित होते.
वृक्षारोपणात पळस, लिंबू , पांगारा, रिठा, आवळा, मेंदी, पेरू, पारिजात, भादवा, शिरीष, कांजी, मुचकुंद, फणस, काटेसावरी , सोनचाफा, आंबा, सप्तपर्णी, आपटा आदी जातींची औषधी झाडे शहर आणि ग्रामीण भागातील मंदिर आणि शाळांच्या परिसरात लावण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे मुख्य चिटणीस सुनील पारखी यांनी दिली.