पुण्यात शाळांना सुट्ट्या जाहीर
मुसळधार पावसाने
मुठेला पूर
शाळांना सुट्ट्या जाहीर
पुणे – पावसाने बुधवारी सकाळपासून खूप जोर धरला त्यामुळे धरणातील जादा पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने मुठा नदीला पूर आला. शहरातील अनेक भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले, झाडे पडली अशा घटना घडल्या.
पावसाचा जोर लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर केली. खडकवासला धरणातून सकाळी ६ वाजता ३५हजार क्यूसेक्स पाणी धरणातून नदीत सोडण्यात आले, त्यामुळे नदीला पूर आला. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने राज्य सरकार आणि महापालिकेचे प्रशासन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहे. महावितरण, अग्निशमन दल आणि पोलीस खात्याचे कर्मचारी अहोरात्र मदतकार्य करीत आहेत.
अनेक भागातील रस्त्यांवरील वाहतूक बंद झाल्याने लोकांची गैरसोय झाली आहे.