मासिक भविष्य


मासिक भविष्य

सौ. स्वप्ना अवसरे – पवार, ( B.S.L, LL.M., ज्योतिष- विशारद)

गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४

मेष : आरोग्य उत्तम राहील.

आगामी ऑगस्ट महिन्यात आपल्या राशीपत्रिकेत शनी अकराव्या स्थानी, राहू बाराव्या स्थानी, केतू सहाव्या स्थानी, गुरु दुसऱ्या स्थानी, मंगळ दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी, रवी चौथ्या व पाचव्या स्थानी, शुक्र पाचव्या व सहाव्या स्थानी व बुध पाचव्या व चौथ्या स्थानी अशी ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्यात आपले आरोग्य उत्तम असणार आहे. आपण उत्साही राहणार आहात. आपली मानसिकता सकारात्मक असणार आहे. आगामी महिन्यात आपले संपूर्ण लक्ष हे आर्थिक बाबीकडे असणार आहे. व्यवसायातील उधारी, उसनवारी तुम्ही वसूल करणार आहात. आगामी महिन्यात आपले आर्थिक नियोजन योग्य ठरणार आहे. आपली महत्त्वाची शासकीय कामे, सरकारी कामे तसेच नोकरीमध्ये आपल्या वरिष्ठांकडे असणारी आपली कामेआपण शक्यतो महिन्याच्या पूर्वार्धात करावीत महिन्याच्या उत्तरार्धात आपल्याला शासकीय कामात त्रास संभवतो. तसेच आपल्या वरिष्ठांशी व वडीलधाऱ्या व्यक्तींबरोबर आपले मतभेद संभवतात. महिन्याच्या शेवटी आपण अधिक जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाणार आहात. आगामी महिन्यात आपले नवे हितसबंध निर्माण होतील. नवे परिचय होतील. आगामी महिन्यात आपण गुंतवणुकीची कामे पूर्ण करु शकणार आहात.
अनु. दि. १,२,३,४,५,६,७,११,१२,१६,१७,१८,१९२०,२१,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३१

वृषभ – मनोबल उत्तम राहील.

Advertisement

आगामी महिन्यात आपल्या राशीपत्रिकेत शनी दहाव्या स्थानी, राहू अकराव्या स्थानी, केतू पाचव्या स्थानी, गुरु पहिल्या स्थानी, मंगळ पहिल्या व दुसऱ्या स्थानी, रवी तिसऱ्या व चौथ्या स्थानी, शुक्र चौथ्या व पाचव्या स्थानी व बुध चौथ्या व तिसऱ्या स्थानी अशी ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहील. आपले मनोबल उत्तम असणार आहे. महिन्याच्या दि. २६ वऑगस्ट पर्यंत प्रथम स्थानी असणारा मंगळ आपल्याला उत्तम आत्मविश्वास देणार आहे. आपण अधिक जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आपल्यावर असणारा ताण आपण उत्तमरितीने सांभाळू शकणार आहात. आपल्यामध्ये चिकाटी असणार आहे. आपल्याला आगामी महिन्यात उत्तम स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. महिन्याच्या पूर्वार्धात काहींना आरोग्यच्या किरकोळ तक्रारींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात त्या कमी होतील. आगामी महिन्यात आपणाला आपली शासकीय कामे महिन्याच्या पूर्वार्धात करावी लागणार आहेत. महिन्याच्या उत्तरार्धात आपल्याला वरिष्ठांच्या नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आपले आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीबरोबर काही वैचारिक मतभेद राहणार आहेत. आगामी महिन्यात प्रवासातून आपल्याला फायदा होईल. नातेवाईकांचे आपल्याला सौख्य लाभेल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्यासमोर काही अनावश्यक खर्च उभे राहणार आहेत. त्यासाठी आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागेल. गुंतवणुकीच्या कामात आपल्याला महिन्याच्या पूर्वार्धात सुयश लाभेल.
अनु. दि. १,२,३,४,५,६,७,८,९,१०,१३,१४,१८,१९,२०,२१,२२,२३,२६,२७,२८,२९,३०,३१

मिथुन – आर्थिक लाभ

आगामी ऑगस्ट महिन्यात आपल्या राशीपत्रिकेत शनी नवव्या स्थानी, राहू दहाव्या स्थानी, केतू चौथ्या स्थानी, गुरु बाराव्या स्थानी,मंगळ बाराव्या व पहिल्या स्थानी, रवी दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी, शुक्र तिसऱ्या व चौथ्या स्थानी तर बुध तिसऱ्या व दुसऱ्या स्थानी अशी ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्यात आपल्या आरोग्य उत्तम असणार आहे. आपले मनोबल कमी असणार आहे. आगामी महिन्यात आपल्याला विशेष आर्थिक लाभ होणार आहेत. आपण आपले पूर्ण लक्ष आर्थिक बाबीवर केंद्रित करणार आहात. आपल्याला आर्थिकदृष्ट्या अनुकूलता लाभणार आहे. महिन्याच्या पूर्वार्धात आपण कोणतेही धाडस व कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा टाळावा. आगामी महिन्याच्या उत्तरार्धात आपले आपल्या नातेवाईकांबरोबर तसेच आपल्या भावंडांबरोबर काही वैचारिक मतभेद राहणार आहेत. तसेच घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या नाराजगीचा देखील आपल्याला सामना करावा लागणार आहे. आगामी महिन्यात आपल्याला प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. आगामी महिन्यात आपण दूरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत किंवा प्रवासात काळजी घ्यावी. आगामी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला मानसिक प्रसन्नता देणारी घटना घडेल. आपल्याल स्वास्थ्य व समाधान लाभेल.
अनु. दि. १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११,१२,१६,१७,२०,२१,२२,२३,२४,२५,२८,२९,३०,३१


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!