लहुराज पांढरे यांच्या हस्ते गुणवंतांना पारितोषिक वितरण
फोटो खालील ओळी :- यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देताना लहुराज पांढरे, शेजारी राजाभाऊ जाधव, रविंद्र कांबळे, साईनाथ वाळेकर,महादेव खंडागळे व इतर
लहुराज पांढरे यांच्या हस्ते गुणवंतांना पारितोषिक वितरण
वाई :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त पी एम श्री कै भ को खरात वाई नगर परिषद क्रमांक १० व व्यवस्थापन समिती यांचे संयुक्त विद्यमाने नगरपालिका शाळा क्रमांक 10 वाई मध्ये गेली 14 वर्ष अहिल्याबाई होळकर निरंतर ठेव योजनेतून अंतरशालेय वकृत्व स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते या स्पर्धा नगरपालिका व खाजगी विभागात घेण्यात आल्या . स्पर्धा एकूण पाच गटा मध्ये पार डल्या. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या वाई नगरपालिका केंद्रात अंतर शालेय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यांचा बक्षीस वितरण समारंभ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी दिवशी रोजी संपन्न झाला . कलासागर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष श्री लहूराज पांढरे यांच्या उपस्थितीत आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालयाचे प्राचार्य श्री रविंद्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात पार पडला. ज्या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेमध्ये यश संपादन केले त्यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करणारे सर्व विद्यार्थ्यांचा व शाळा स्तराव आदर्श विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी वाईचे गटशिक्षणाधिकारी श्री साईनाथ वाळेकर तसेच माजी नगराध्यक्ष श्री राजाभाऊ खरात सामाजिक कार्यकर्ते श्री अरुण आदलिंगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ प्रियांका जाधव, उपाध्यक्ष सौ मीना वायदंडे सर्व शाळांचे मुख्याध्यापक, व पालक व यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक वरिष्ठ मुख्याध्यापक श्री महादेव अडगळे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री शामराव पवार श्री किसन रेंजर श्री गजानन खंदारे श्री मुरलीधर जाधव सौ शारदा परामणे, सौ संगीता अरगडे श्रीमती अश्विनी सूर्यवंशी सौ आशा मोरे श्रीमती सीमा तांबे सौ रुपाली पांढरपोटे श्रीमती प्रीती ससाणे, श्रीमती संतोषी देवरे श्रीमती रंजना पवार यांनी परिश्रम घेतले. आभार सौ.आशा मोरे यांनी मानले.