रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन
सातारा (जिमाका): रानभाज्याचे, रानफळाचे आरोग्य विषयक महत्व व माहिती ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना व्हावी यासाठी पोलीस करमणूक केंद्र येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी उभारण्यात आलेल्या स्टॉलला भेटी देवून रानभाज्या व रानफळांची माहिती घेतली.
या प्रसंगी रानभाजी महोत्सव पुस्तिकेचे विमोचनही पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
0000