राशिभविष्य


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, भाद्रपद शुक्ल पंचमी, ऋषीपंचमी, रविवार, दि. ८ सप्टेंबर २०२४, चंद्र – तुला राशीत, नक्षत्र – स्वाती दु. ३ वा. ३१ मि. पर्यंत नंतर विशाखा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. २७ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ४४ मि.

नमस्कार आज चंद्र तुला राशीत रहाणार आहे. आजचा दिवस दु. ३ पर्यंत चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र लाभयोग, रवि – शनि प्रतियोग व चंद्र – शनी त्रिकोणयोग होत आहे. आज मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर वृषभ, वृश्चिक व मीन या राशींना प्रतिकूल असणार आहे.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : तुम्ही आपली मते व आपले विचार स्पष्टपणे मांडणार आहात. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुमच्या ,मानसिकतेमध्ये काही सकारात्मक बदल होणार आहेत.

वृषभ : मानसिक उद्विग्नता राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. काहींना अनावश्यक कामात आपला वेळ वाया जातोय, याचा त्रास होणार आहे.

मिथुन : वैचारिक परिवर्तन होणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना आपल्या बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम असणार आहे.

कर्क : मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रावस सुखकर होणार आहेत. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा उत्साही सहभाग राहील. मानसन्मान लाभेल. प्रवास सुखकर होतील.

सिंह : मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून मिळालेल्या संधीचा फायदा घेणार आहात. प्रवास सुखकर होतील.

Advertisement

कन्या : काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायातील येणी वसूल होतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मनोबलव आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तुळ : आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. स्वास्थ्य लाभेल.

वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. आपले श्रम वाया जातील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. काहींचा आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवासात काळजी घ्यावी.

धनु : मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. तुमच्या प्रियजनांसाठी आपण आवर्जून वेळ काढाल. आर्थिक लाभ होणार आहेत. बौद्धिक प्रभाव राहील.

मकर : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पार पडणार आहेत.

कुंभ : मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना अनपेक्षितपणे अनुकूल संधी प्राप्त होईल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मीन : प्रवासाचे नियोजन आज नको. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. एखाद्या अप्रिय घटनेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

आज रविवार, आज दुपारी ४.३० ते ६ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!