आजचा दिवस
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, सोमप्रदोष , त्रयोदशी श्राद्ध, सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४, चंद्र – सिंह राशीत, नक्षत्र – पूर्वा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३० मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. २७ मि.
नमस्कार आज चंद्र सिंह राशीत रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज रवि – बुध युतीयोग, चंद्र – मंगळ लाभयोग, चंद्र – शुक्र लाभयोग, चंद्र – शनि प्रतियोग व मंगळ – शनि त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक, धनु व कुंभ या राशीना अनुकूल तर कन्या, मकर व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
सोमवार, दि. ३० सप्टेंबर२०२४
मेष : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. विविध लाभ होतील. मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल.
वृषभ : दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मानसन्मानाचे योग येणार आहेत. सार्वजनिक कामात सहभाग वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.
मिथुन : कामाचा ताण कमी होईल. उमेद वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल उत्तम राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : आर्थिक कामांना गती मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी घटना अनुभवण्यास मिळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या कामांना अनुकूलता लाभेल. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे.
कन्या : मानसिक अस्वस्थता राहील. अनावश्यक खर्च होतील. तुम्ही आपल्या कामांचे नियोजन करु शकणार नाहीत. काहींचा मनोरंजनाकडे तर काहींचा आराम करण्याकडे कल राहील. प्रवास आज नकोत.
तुला : काहींना विविध लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल.
वृश्चिक : सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी आज कमी होणार आहेत. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत.
धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर : मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. वादविवादात सहभाग टाळावा. आपले मनोबल कमी असणार आहे. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. अडचणी जाणवतील.
कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. आज तुमचा सर्वत्र आत्मविश्वासपूर्वक वावर असणार आहे. आपली मते व आपले विचार स्पष्ट असणार आहेत. प्रवास होतील.
मीन : मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. तुमच्यावर कसलेतरी अनावश्यक दडपण राहील. दैनंदिन कामे रखडणार आहेत. एखादी चिंता सतावेल. अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाईल.
****
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४