वाई तालुक्यात ओटी सुरक्षित मातृत्वाची कार्यक्रम
वाई तालुक्यात ओटी सुरक्षित मातृत्वाची कार्यक्रम
वाई दि २:-
वाई तालुक्यातील बाल मृत्यू व माता मृत्यू कमी करणे साठी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या संकल्पनेतून तालुका प्रभावी उपाययोजना राबविण्या करीता.सपुर्ण वाई तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर “ओटी सुरक्षित मातृत्वाची” कार्यक्रम गावं निहाय गरोदर माता व स्तनदा माता यांचे मेळावे घेऊन त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा तपासणी, उपचार, संदर्भ सेवा, इत्यादी बाबत समुपदेशन करण्यात आले .
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प यांचे सहकार्याने व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांनी आपले गावातील नोंदनी केलेल्या एकुण ३३७ गरोदर माता, व स्तनदा माता यांना प्रत्येकी मातेस पौष्टीक आहार पॅकेट देण्यात आले.
पौष्टीक आहार सचिता
सुकामेवा ५० ग्रॅम , गुळ ५० ग्रॅम , शेंगदाणे ५० ग्रॅम, आवळा कॅन्डी ५० ग्रॅम, हळीव ५० ग्रॅम ,कडधान्य ५० ग्रॅम, खजूर ५० ग्रॅम,खोबरं ५० ग्रॅम,खारीक ५० ग्रॅम,या प्रमाणे पौष्टीक आहार पॅकेट व मार्गदर्शन पुस्तीका पुरविल्या.या बाबतचा खर्च (ग्राम निधी),१० टक्के १५ वित्त आयोग,व लोकसहभागातून फळे वाटप करण्यात आले.
“ओटी सुरक्षित मातृत्वाची” कार्यक्रमात जोखीमीच्या गरोदर माता तपासणी करीता.प्रा.आ.केन्द व बेल एअर हाॅस्पिटल वाई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ जितेंद्र सिंह राजपूत स्त्रीरोग तज्ञ व प्राथमिक आरोग्य केंद्रा चे वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत तपासणी करून उपचार करण्यात आले. आवश्यक त्या गरोदर माता ना संदर्भ सेवा देण्यात आल्या प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय गरोदर माता तपासणी चे नियोजन करण्यात आले.त्यात
भुईंज मध्ये गरोदर माता तपासणी ४९, बावधन मध्ये द ६०,मालतपुर ३२, कवठे मध्ये ५७ मातांची तपासणी करण्यात आली.दरमाह प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकाणी सर्व गरोदर माता ची तपासणी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सर्व गरोदर माता ची तपासणी *प्राथमिक आरोग्य केंद्र व बेल एअर हाॅस्पिटल वाई* यांचे संयुक्त विद्यमाने स्त्री रोग तज्ञ यांचे मार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे परीट यांनी सांगितले.
कार्यक्रम गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदिप यादव, डॉ जितेंद्र सिंह राजपूत स्त्रीरोग तज्ञ, व बेल एअर हाॅस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संदिप बाबर, विस्तार अधिकारी प्रशांत माने हरीदास घुले तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वाई.तालुक्यातील सर्व JB आरोग्य कर्मचारी यांनी सदर कार्यक्रमास सहभाग दाखविला.