ऑक्टोबर २०२४ मासिक राशिभविष्य


ऑक्टोबर २०२४ मासिक राशिभविष्य

कर्क रास : महिन्याच्या उत्तरार्धात हटवादी रहाल.

आगामी ऑक्टोबर महिन्यात आपल्या राशीपत्रिकेत शनी आठव्या स्थानी, गुरु अकराव्या स्थानी, राहू नवव्या स्थानी, केतू तिसऱ्या स्थानी, मंगळ बाराव्या व पहिल्या स्थानी, रवी व बुध तिसऱ्या व चौथ्या स्थानी, शुक्र चौथ्या व पाचव्या स्थानी याप्रमाणे ग्रहस्थिती आहे. आगामी महिन्याचा पूर्वार्ध आपणाला काहीप्रमाणात खर्चिक तसेच वेळखाऊ जाण्याची शक्यता आहे. काही अनावश्यक बाबीवर आपला वेळ वाया जाणार आहे. आपली मानसिकता ही काहीप्रमाणात नकारात्मक असणार आहे. आपल्याला मानसिक अस्वस्थता राहील. आपल्यावर कसलीतरी जबाबदारी राहील. त्याचबरोबर आपल्याला कसलीतरी अनामिक भीती राहील किंवा कसलीतरी अनावश्यक चिंता आपल्याला सतावणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात आपण अधिक हटवादी राहणार आहात. काहीबाबतीत आपली आपले तेच खरे करण्याची सवय राहील, आपली वृत्ती काहीप्रमाणात हेकेखोर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला काही अनावश्यक वादविवादांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र त्याचबरोबर महिन्याच्या उत्तरार्धत आपल्याला काहीबाबतीत सौख्य व समाधान देखील लाभणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात आपले निर्णय अचूक ठरतील. तुमचे व्यवसायिक अंदाज अचूक ठरणार आहेत. महिन्याच्या उत्तरार्धात तुमचे काही नवीन स्नेहसंबंध जुळतील. नवीन परिचय होतील. विवाहेच्छूक तरुण तरुणींचे विवाह जमून येण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल.
अनु. दि. ३,४,५,६,७,८,१२,१३,१६,१७,१८,१९,२०,२१,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३१

सिंह : महिन्याचा उत्तरार्ध प्रॉपर्टीसाठी अनुकूल

Advertisement

आगामी ऑक्टोबर महिन्यात आपल्या राशीपत्रिकेत शनी सातव्या स्थानी, गुरु दहाव्या स्थानी, राहू आठव्या स्थानी, केतू दुसऱ्या स्थानी, मंगळ अकराव्या व बाराव्या स्थानी, रवी व बुध दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी तर शुक्र तिसऱ्या व चौथ्या स्थानी याप्रमाणे ग्रहस्थिती आहे. आगामी ऑक्टोबर महिन्यात आपले आरोग्य उत्तम असणार आहे. आपण अधिक कार्यक्षमतेने व अधिक जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आगामी महिन्यात आपले आपल्या नातेवाईकांबरोबर उत्तम संवाद राहणार आहे. आगामी महिन्यात आपल्याला आपल्या नातेवाईकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आगामी महिन्याच्या पूर्वार्धात आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. आगामी महिन्याच्या पूर्वार्धात व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. आपल्याला आर्थिक लाभ होतील. तसेच महिन्याच्या पूर्वार्धात आपण आपली शासकीय कामे, सरकारी कामे पूर्ण करु शकणार आहात. महिन्याचा उत्तरार्ध हा आपणाला अधिक सौख्यकारक व समाधानकारकअसणार आहे. विशेषतः प्रॉपर्टी व गुंतवणूक याकरिता आगामी महिन्याचा उत्तरार्ध आपणाला विशेष अनुकूल असणार आहे. आगामी महिन्यात आपण आपल्या राहत्या जागेसंदर्भात किंवा व्यवसायाच्या जागेसंदर्भात काही प्रश्न असतील तर ते आपण सोडवू शकणार आहात. आगामी महिना आपणाला प्रवासाकरिता अनुकूल असणार आहे.
अनु. दि. ३,४,५,६,७,८,९,१०,१४,१५,१८,१९,२०,२१,२२,२३,२७,२८,२९,३०,३१

कन्या : चिकाटी वाढेल.

आगामी ऑक्टोबर महिन्यात आपल्या राशीपत्रिकेत शनी सहाव्या स्थानी, गुरु नवव्या स्थानी, राहू सातव्या स्थानी, केतू पहिल्या स्थानी, मंगळ दहाव्या व अकराव्या स्थानी, रवी व बुध पहिल्या व दुसऱ्या स्थानी तर शुक्र दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी याप्रमाणे ग्रहस्थिती असणार आहे. आगामी महिन्यात आपण अधिक चिकाटीने वागणार आहात. तुमच्या मनोबलामध्ये वाढ होणार आहे. तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे. तुम्ही आपले पूर्ण लक्ष आपल्या कार्यक्षेत्राकडे लावणार आहात. आगामी काळात तुम्ही आपल्या कामाकडे अधिक गांभीर्याने पाहणार आहात. सार्वजनिक व सामाजिक कार्यात तुमचा सहभाग असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुमचे आरोग्य उत्तम असल्याने सर्वत्र तुमचा आत्मविश्वासपूर्वक वावर राहील. आगामी महिन्याच्या उत्तरार्धात काहीवेळा आपल्यासमोर काही अनावश्यक खर्च उभे रहाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण काहीतरी तरतूद ठेवावी. आगामी महिन्याच्या उत्तरार्धात आपण प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. महिन्याच्या उत्तरार्धात आपल्याला नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एकूणच, आगामी महिना आपल्याला आपल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने विशेष अनुकूल असणार आहे.
अनु. दि. ३,४,५,६,७,८,९,१०,११,१२,१६,१७,२०,२१,२२,२३,२४,२५,२९,३०,३१


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!