आजचा दिवस
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, कार्तिक शुक्ल द्वादशी, प्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास्य समाप्ती, बुधवार, दि. १३ नोव्हेंबर २०२४, चंद्र – मीन राशीत, नक्षत्र – रेवती, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४६ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ०० मि.
नमस्कार आज चंद्र मीन राशीत रहाणार आहे. आजचा दिवस शुभ दिवस आहे. आज रवि – चंद्र षडाष्टकयोग, चंद्र – बुध त्रिकोणयोग व चंद्र – गुरु लाभयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन,कर्क,कन्या, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, सिंह व तुला या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. प्रतिकुलता जाणवणार आहे. मनोबल कमी राहील, प्रवास टाळावेत. दैनंदिन कामे रखडणार आहेत. कामाचा ताण जाणवेल.
वृषभ : प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना विविध लाभ होणार आहेत. आज आपण जुन्या आठवणींत रमणार आहात. अनेकांचे सहकार्य लाभेल. संततीसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.
मिथुन : दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पडतील. आज आपण विशेष उत्साही रहाल. प्रवास होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल.
कर्क : मानसिक अस्वस्थता कमी होईल. अनुकूलता प्राप्त होईल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता कमी होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना नवीन सुसंधी लाभणार आहे.
सिंह : मानसिक उदासीनता राहील. कटकटी वाढणार आहेत. वादविवाद शक्यतो टाळावेत. आत्मविश्वास कमी राहील. महत्त्वाची कामे आज नकोत. एखाद्या बाबतीत अनावश्यक चिंता करणार आहात.
कन्या : मानसिक उत्साह व उमेद वाढेल. कामाचा ताण असला तरी तो उत्साहाने पूर्ण कराल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आनंदी रहाल. आपल्या कामाने अनेकजण प्रभावित होणार आहेत.
तुला : अनावश्यक ताण तणाव राहतील. कामात चूक होईल. मनोबल कमी असणार आहे. प्रतिकुलता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने जपून चालवावीत. काहींचा आराम करण्याकडे कल राहील.
वृश्चिक : तुमचा बौद्धिक प्रभाव वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मनोबल उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. नोकरीत स्वास्थ्य लाभेल.
धनु : मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादी रहाल. कामे यशस्वी होतील. कामाचा ताण कमी होईल. उमेदीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल.
मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. एखादा सुखद अनुभव येईल. काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. जिद्दीने कार्यरत रहाणार आहात. मनोबल उत्तम राहील. चिकाटी वाढेल.
कुंभ : आर्थिक नियोजन करु शकाल. कामाचा ताण कमी होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. सध्या आपण सर्वच बाबतीत आशावादी रहावे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
मीन : तुम्ही आपल्या कामाने इतरांना प्रभावित करणार आहात. आरोग्य सुधारणार आहे. मनोबल वाढेल. रखडलेल्या कामात सुयश लाभेल. आनंदी रहाणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल.
आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४