आजचा दिवस
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, कार्तिक कृष्ण सप्तमी, शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर २०२४, चंद्र – कर्क राशीत, नक्षत्र – आश्लेषा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ५१ मि. , सुर्यास्त- सायं. १७ वा. ५८ मि.
नमस्कार आज चंद्र कर्क राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज चंद्र – बुध त्रिकोणयोग व शुक्र – शनि लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक, मकर व मीन या राशींना अनुकूल तर सिंह, धनु व कुंभ या राशींना प्रतिकूल असणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आजची आपली सर्व दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आज तुम्ही विशेष आनंदी व आशावादी राहणार आहात.
वृषभ : जिद्दीने कार्यर्ह राहून आजची आपली सर्व कामे यशस्वी कराल. नवा मार्ग दिसेल. नातेवाईकांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल वाढणार आहे. प्रवास करावा लागेल.
मिथुन : कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आज तुम्ही आपले विचार व आपली मते स्पष्टपणे मांडू शकणार आहात. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : मनोबल कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. प्रवास आज नकोत.
कन्या : आर्थिक लाभ होतील. आज तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आज तुम्ही तुमचे बौद्धिक कौशल्य सिद्ध करणार आहात.
तुला : आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक कामात मानसन्मान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक : कामे यशस्वी होणार आहेत. अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. मनोबल उत्तम राहील. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभेल.
धनु : जिद्दीने कार्यरत रहावे लागेल. मनोबल कमी असल्याचे जाणवेल. अकारण कोणत्याही वादविवादात पडू नये. आज आपल्याला मानसिक चिंता सतावणार आहेत. प्रवास टाळावेत.
मकर : जिद्द वाढेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभणार आहे. मनोबलाच्या जोरावर अनेक कामात सुयश मिळवाल.
कुंभ : प्रवास शक्यतो आज नकोत. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने तुमची चिडचिड होईल.
मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या प्रियजनांसाठी व तुमच्या मुलामुलींच्या करिता विशेष वेळ देऊ शकणार आहात. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे.
आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४