ऋग्वेद भूषण पुरस्कार ह.भ.प श्री योगीराज महाराज गोसावी यांना जाहीर
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था
- यंदाचा ऋग्वेद भूषण पुरस्कार
ह.भ.प श्री योगीराज महाराज गोसावी
यांना जाहीर
पुणे – देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा ऋग्वेद भूषण पुरस्कार शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचे १४वे वंशज ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी (पैठणकर) यांना जाहीर झाला आहे.
संस्थेच्या वतीने दिला जाणारा ऋग्वेद भूषण पुरस्कार आणि अन्य पुरस्कारार्थींच्या नावांची घोषणा अध्यक्ष श्री.राजेंद्र कुलकर्णी आणि मुख्य चिटणीस सुनील पारखी यांनी केली. ऋग्वेद भूषण पुरस्कार हा मानाचा पुरस्कार असून, रोख रुपये १०हजार१, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संस्थेचे पुरस्कार आणि पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे कै.प्रमिलाबाई देशपांडे संगीत पुरस्कार – श्री.जयदीप वैद्य., कै.आबासाहेब मुजुमदार समाजभूषण पुरस्कार – महाराष्ट्र ब्राह्मण सभा पुणे., वेदाध्ययन करणाऱ्यांना उत्तेजनार्थ देण्यात येणारा ऋग्वेद पुरस्कार – वेदमूर्ती श्रीनिधी स्वानंद धायगुडे., विज्ञान, संशोधन अभ्यासक पुरस्कार – डॉ.आमोद साने., आदर्श स्थापत्य शास्त्रज्ञ पुरस्कार – विक्रम हुंडेकर., इतिहास/साहित्य संशोधक पुरस्कार – महेश मंगेश तेंडुलकर., आदर्श समाजसेवा पुरस्कार – रघुनाथ ढोले., प्रिंटिंग क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल सर्वोदय पुरस्कार – चंद्रशेखर जोशी.
इतिहास, विज्ञान संशोधन, साहित्य संशोधन, प्रिंटिंग क्षेत्र आणि सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात, असे राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता, सदाशिव पेठेतील भिकारदास मारूती मंदिराजवळील, १७१२/१ बी, उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.
संस्थेने नुकतेच शताब्दी वर्ष पूर्ण केले असून १०१ व्या वर्षात पदार्पण केले आहे