श्री.भद्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेस ‘ बँको ब्ल्यू रिबन ‘ पुरस्कार
छायाचित्र ओळी:- माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दत्ता मर्ढेकर ,बापूसाहेब जमदाडे, भद्रेश भाटे,
संगीता बारटक्के, मंजुळा शिंदे
वाई:- श्री.भद्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेस ‘ बँको ब्ल्यू रिबन ‘ पुरस्कार
वाई,ता.१४:- येथील श्री.भद्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेस २०२३-२४ साठीचा ‘ बँको ब्ल्यू रिबन व’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोणावळा येथे कोल्हापुरातील अविज पब्लिकेशन आणि गॅलेक्सी इन्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पतसंस्थांच्या परिषदेत माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते पतसंस्थेचे संस्थापक दत्तात्रय मर्ढेकर, अध्यक्ष बापूसाहेब जमदाडे, सचिव भद्रेश भाटे, व्यवस्थापिका श्रीमती संगीता बारटक्के व मंजुळा शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अविनाश शिंत्रे, अशोक नाईक उपस्थित होते.
यावेळी श्री.दळवी म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागात सर्वसामान्यांचे आर्थिक जीवन समृद्ध करण्यात पतसंस्थांचे मोठे योगदान आहे. मात्र काही पतसंस्थांच्या संचालकांच्या चुकीच्या धोरणामुळे चांगले काम करणाऱ्या पतसंस्थांपुढे अडचणी निर्माण होत आहेत.
अध्यक्ष बापूसाहेब जमदाडे यांनी संस्थेच्या एकूण ठेवी ११ कोटी १३ लाख असून कर्ज वाटप ८ कोटी ६८ लाख केले. खेळते भांडवल १४ कोटी ६० लाख रुपये असून गुंतवणूक ३ कोटी
९५ लाख रुपये केली आहे तर १७ लाख ९५ हजार नफा झाला असल्याची माहिती दिली.
या पुरस्काराबद्दल रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी, शांताराम भालेराव, विवेक घळसासी, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ.शेखर कांबळे, ज्ञानदीप पतसंस्थेच्या वाई शाखेचे अधिकारी सुनिल अनपट, मनोज जगताप, लोकमान्य मल्टी पर्पज
को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गौरी जाधव यांनी अभिनंदन केले.
—-