राशीभविष्य
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, माघ कृष्ण पंचमी, सोमवार, दि. १७ फेब्रुवारी २०२५, चंद्र – कन्या राशीत सायं. ६ वा. ०३ मि. पर्यंत नंतर तुला राशीत, नक्षत्र – चित्रा, सुर्योदय- सकाळी ०७ वा. ०७ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ३९ मि.
नमस्कार आज चंद्र कन्या राशीत सायं. ६ वा. ०३ मि. पर्यंत नंतर तुला राशीत रहाणार आहे. आजचा दिवस उत्तम दिवस आहे. आज रवि – चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर व मीन या राशींना अनुकूल तर मेष, तुला व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आर्थिक बाबतीत आपल्याला काळजी सतावणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात कमी पडाल. मानसिक अस्वस्थता राहील.
वृषभ : तुम्ही आपल्या मुलामुलींकरिता व प्रियजनाकरिता वेळ देऊ शकणार आहात. आपल्यावर असणारी जबाबदारी योग्य रितीने पार पाडणार आहात. कामे यशस्वी होणार आहात.
मिथुन : तुम्हाला आज आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहता येणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. आजचा दिवस आपल्याला अनेक कामाकरिता अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील.
कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल संधी लाभणार आहे. प्रसिद्धी मिळेल. प्रवास सुखकर होतील.
सिंह : कामे यशस्वी होणार आहेत. आर्थिक लाभ होणार आहेत. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. कुटूंबातील सदस्यांचे आपल्याला उत्तम सहकार्य लाभणार आहे.
कन्या : कामाचा ताण कमी असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. मनोबल वाढेल.
तुला : मनोबल कमी असणार आहे. तुमच्यावर असणारा ताण वाढणार आहे. काहींना नैराश्य जाणवेल. मानसिक त्रास देणारी एखादी घटना घडण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवावित.
वृश्चिक : प्रवासात आनंद मिळेल. काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. कामाचा ताण कमी होणार आहे. मनोबल उत्तम राहील.
धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मानसन्मान लाभेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम असणार आहे. तुमच्यावर असणारा ताण कमी होणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे.
मकर : आज तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे. आपल्यावर असणारा ताण कमी होईल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील. चिंता कमी होणार आहेत. कामे मार्गी लागतील.
कुंभ : आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. मनोबल कमी असल्याने कामात लक्ष लागणार नाही. आज आपल्याला कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मीन : मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्यावर असणारी ताण कमी होईल. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहणार आहे.
आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054