क्राईम न्यूज
बिअरची बाटली डोक्यात फोडून एकाचा खून
वाई
सोनगीरवाडी, वाई येथे एकाचा अमानुषणे मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे वाईसह तालुक्यात खळबळ उडाली असुन याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. १८ रोजी रात्री १० च्या सुमारास राज अरुणकुमार सिंग, वय २६, सध्या रा. श्रीस्वामी समर्थ अपार्टमेंट, तीसरा मजला साक्षीविहार, जगताप हॉस्पीटल जवळ, वाई, ता. वाई, जि. सातारा, मुळ रा. जसवली, ता. महानंदपुर, जि. नवादा, बिहार हा आणि त्याचे मित्र प्रणित गायकवाड, रा. परखंदी, ता. वाई, जि. सातारा, शाकीर खान, रा. निळाकट्टा, सोनगीरवाडी, वाई, ता. वाई, जि. सातारा, विनोद साळुंखे व हर्षवर्धन कारेकर हे सोनगीरवाडी, वाई येथील बाभाळवनात दारू पिण्यासाठी बसले होते. दरम्यान, शाकीर याने हर्षवर्धन याच्या कानफाटात मारल्याने तो तिथून निघून गेला. त्यानंतर राज, प्रणित व शाकीर यांच्यात चेष्टामस्करीतून वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेल्याने प्रणित याने राज याच्या डोक्यात बिअरच्या दोन बॉटल फोडल्या. शाकीर व प्रणित यांनी मिळून बांबूने राज याला जबर मारहाण केली. विनोद याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत राज रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्यानंतर प्रणित व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धुम ठोकली. घडलेला प्रकार विनोद याने राजचा भाऊ अश्विनी सिंग याला दि. १९ रोजी पहाटे ३ वाजता फोन करून सांगितला. त्यांनतर अश्विनी याने घटनास्थळावर जाऊन पाहिले. राज याला ॲम्बुलन्स मधून ग्रामीण रुग्णालय वाई येथे नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण करत त्याचा खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विनी सिंग याने वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी करत आहेत.