पंचगव्य ओझोन आधारित आरोग्य नवरात्र
पंचगव्य ओझोन आधारित
आरोग्य नवरात्र
जनमित्र सेवा संघाचा
अभिनव उपक्रम
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळिराम हेडगेवार यांच्या जन्मदिनानिमित्त पंचगव्य आणि ओझोन चिकित्सा असा ‘आरोग्य नवरात्र’ उपक्रम जनमित्र सेवा संघाचे चिटणीस डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी १ ते १० एप्रिल २०२५ पर्यंत आयोजित केला आहे.
देशी गाईचे दूध आणि त्या दुधापासून होणारे दही, तूप तसेच गाईचे गोमूत्र, गोमय असे पंचगव्य म्हणून ओळखले जाणारे पाच पदार्थ आणि ओझोन हे वैज्ञानिक संशोधन या दोन्हींची एकत्रित चिकित्सा म्हणजे पंचगव्य आधारित ओझोन चिकित्सा. या चिकित्सेचा उपयोग कॅन्सर तसेच कोणत्याही दीर्घकालीन दुर्धर आजारांवर देखील अत्यंत प्रभावी पद्धतीने, सकारात्मक रिझल्ट देणारा होतो. या उद्देशाने जनमित्र सेवा संघाने पंचगव्य ओझोन आधारित ‘आरोग्य नवरात्र’ उपक्रमात नऊ दिवस रोज एक वेगळा आजार आणि त्यावरचे शक्य तितके मोफत औषधोपचार करण्याचे ठरविले आहे. या आरोग्य नवरात्रात १)कॅन्सर (सर्व प्रकारचे), २)गुडघेदुखी, अन्य सांधेदुखी, ३)पित्त वृद्धी, (हायपर ॲसिडिटी), ४)मधुमेह, किडनीचे आजार, ५) रक्तदाब ६) हृदयाचे ब्लॉकेजेस/धमणी अवरोध, ट्रायग्लिसराईड्स, कोलेस्टेरॉल, ७) चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन वर तसेच चेहरा आकर्षक दिसावा यासाठी उपयुक्त चिकित्सा, ८)दमा, फुफ्फुसाचे आजार, ,९) मानसिक ताण-तणाव, निद्रानाश व त्यापासून होणारे आजार या सर्वावर या चिकित्सेद्वारे उपचार करण्यात येतील.
या उपचारांसाठी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळात नोंदणी चालू आहे. त्यासाठी
94230 36965, 90116 96965 या नंबर्सवर संपर्क करावा.