आजचा दिवस


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर,फाल्गुन कृष्ण नवमी, रविवार, दि. २३ मार्च २०२५, चंद्र – धनु राशीत, नक्षत्र – पूर्वाषाढा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४१ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ४९ मि.

नमस्कार आज चंद्र धनु राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज चंद्र – मंगळ प्रतियोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कर्क व मकर या राशींना प्रतिकूल जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडणार आहे. वरिष्ठांचे अपेक्षित मार्गदर्शन लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृषभ : मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता देणारी एखादी घटना संभवते. प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवाद नकोत.

मिथुन : उत्साहाने कार्यरत राहणार आहात. उमेद वाढेल. आनंदी राहणार आहात. अनुकूलता लाभेल.

कर्क : कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. विरोधकांवर व हितशत्रुंवर मात कराल. अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.

सिंह : प्रियजन भेटणार आहेत. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस विशेष अनुकूल आहे.

Advertisement

कन्या : आशावादीपणे कार्यरत रहाल. आनंददायी घटना घडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे.

तुळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. प्रवासास अनुकूलता लाभणार आहे.

वृश्‍चिक : आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूलता लाभेल. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल.

धनु : अनेकांशी सुसंवाद साधाल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.

मकर : आज आपला मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे. दैनंदिन कामात अडचणी येतील.

कुंभ : जुने मित्रमैत्रिणी व सहकारी भेटतील. प्रियजनांबरोबर सुसंवाद राहील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल.

मीन : प्रवासात अनुकूलता लाभेल. आनंदी राहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम असणार आहे. अधिकाराने वागाल.

आज रविवार, आज दुपारी ४.३० ते ६ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 982230305


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!