साप्ताहिक राशिभविष्य
सौ. स्वप्ना अवसरे – पवार, ( B.S.L, LL.M., ज्योतिष- विशारद)
गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४
साप्ताहिक राशिभविष्य
दि. १४ एप्रिल २०२४ ते दि. २० एप्रिल २०२४
आगामी सप्ताहात, मंगळवार, दि. १६ एप्रिल रोजी दुर्गाष्टमी आहे, बुधवार, दि. १७ रोजी श्रीरामनवमी आहे, शुक्रवार, दि १९ रोजी कामदा एकादशी आहे. आगामी सप्ताहात आज रविवार, दि. १४ एप्रिल चांगला दिवस, सोमवार, दि. १५ एप्रिल दु. १२ पर्यंत चांगला दिवस, मंगळवार, दि. १६ एप्रिल चांगला दिवस, बुधवार दि. १७ एप्रिल चांगला दिवस, गुरुवार, दि. १८ एप्रिल उत्तम दिवस, शुक्रवार, दि. १९ एप्रिल भद्रा वर्ज्य दिवस, तर शनिवार, दि. २० एप्रिल चांगला दिवस याप्रमाणे दिवस आहेत. आगामी सप्ताहात चंद्राचे मिथुन, कर्क व सिंह या राशीतून भ्रमण होणार आहे. आगामी सप्ताह हा मेष, वृषभ, मिथुन व तुला या राशींच्या व्यक्तींना विशेष अनुकूल आहे.
मेष – अनुकूलता राहील.
आगामी सप्ताहात आपणाला चंद्राची अनुकूलता राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला आपण आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहात. तुम्हाला नवीन सुसंधी लाभेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना व्यवसायानिमित्त तर काहींना नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीला आपण आपल्या नातेवाईकांच्या सहकार्याने एखादा प्रश्न सोडवणार आहात. सप्ताहाच्या मध्ये एक दोन दिवस आपल्याला उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्याला मानसिक प्रसन्नता देणाऱ्या काही घटना अनुभवता येणार आहेत. आगामी सप्ताहात प्रत्यक्ष आर्थिक लाभ झाले नाहीत तरी आगामी संपूर्ण सप्ताह आपल्याला कामामध्ये व्यग्र ठेवणारा असाच आहे. आगामी सप्ताहात आपल्याला सार्वजनिक कामात मानसन्मान लाभणार आहे. आगामी संपूर्ण सप्ताहभर आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे.
अनु. दि. १४ ते २०
वृषभ : आर्थिक प्रगती
आगामी सप्ताह आपणाला आर्थिक लाभ मिळवून देणारा असणार आहे. आगामी सप्ताहात आपले मनोबल उत्तम राहणार आहे. आगामी संपूर्ण सप्ताहात आपल्या आरोग्याची आपल्याला उत्तम साथ लाभणार आहे. आगामी सप्ताहाची सुरुवात ही कौटुंबिक स्वास्थ्याची व समाधनाची असणार आहे. आगामी सप्ताहात आपल्याला नातेवाईकांच्या गाठीभेटी घेता येणार आहेत. आगामी सप्ताहात आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात नवीन दिशा सापडेल. नवीन सुसंधी लाभेल. आगामी संपूर्ण सप्ताह आपणाला प्रवासाकरिता अनुकूल असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगामी सप्ताह आपणाला आर्थिक कामासाठी विशेष अनुकूल असणारा आहे. आगामी सप्ताहात आपली जुनी येणी वसूल होतील. व्यवसायातील आपले आर्थिक अंदाज अचूक ठरतील व आपल्याला स्वास्थ्य व समाधान लाभेल. आगामी सप्ताहात आपल्याला आपल्या प्रियजनांना वेळ देता येणार आहे.
अनु. दि. १४ ते २०
मिथुन : आरोग्य उत्तम राहील.
आगामी सप्ताह आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. आगामी सप्ताहात आपले मनोबल उत्तम राहील. आपला आत्मविश्वास विशेष राहील. आपल्या आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत व त्यामुळे आगामी संपूर्ण सप्ताहात आपण विशेष उत्साहाने कार्यरत असणार आहात. आगामी सप्ताहात आपण आपल्या काही महत्त्वाच्या कामांचे नियोजन करु शकता. आगामी सप्ताहात आपल्याला प्रवासाचे विशेष योग येणार आहेत व आपले प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिक लाभाच्या दृष्टीने आगामी सप्ताहात अनुकूल योग येणार आहेत. आर्थिक कामाचे नियोजन आपण आगामी सप्ताहात करु शकता. कौटुंबिक सौख्य लाभेल.
अनु. दि. १४ ते २०
कर्क : उत्तरार्ध अनुकूल
आगामी सप्ताहाची सुरुवात ही आपणाला काहीशी प्रतिकूल असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच आपला उत्साह कमी असणार आहे. आपल्या मनावर कसलातरी ताण राहील. आपल्याला आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. सप्ताहाचा उत्तरार्धात आपले आरोग्य उत्तम राहील. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आपली महत्त्वाची कामे आपण शक्यतो सप्ताहाच्या उत्तरार्धात नियोजित करावीत. सप्ताहाच्या उत्तरार्धात आपले मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आपले आरोग्य उत्तम राहील. सप्ताहाच्या उत्तरार्धात आपल्याला वैवाहिक व कौटूंबिक सौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभ होतील.
अनु. दि. १६ ते २०
सिंह : संमिश्र सप्ताह
आगामी सप्ताह हा आपणाला संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आपले मनोबल उत्तम असेल मात्र स्पप्ताहाच्या मध्ये एक दोन दिवस आपल्यावर कसलातरी ताण राहील. आपल्याला आरोग्याच्या तक्रारी राहतील. आपले मनोबल कमी राहील.आगामी सप्ताहात आपल्याला काही अनावश्यक खर्च करावे लागणार आहेत. आपल्याला मानसिक अस्वस्थता राहील. आपले मागे काही विवंचना राहतील. सप्ताहाच्या शेवटी मात्र आपल्याला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना आपल्याला नक्कीच अनुभवण्यास मिळेल. आगामी सप्ताहात आपण प्रवासाचे नियोजन शक्यतो टाळावे. तसेच आगामी सप्ताहात आपण कसलेही धाडस करण्याचे टाळावे.
अनु. दि. १४,१५,१८,१९,२०
कन्या : पूर्वार्ध अनुकूल
आगामी सप्ताहाचा पूर्वार्ध आपणाला अनुकूल असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आपले आरोग्य उत्तम राहील. आपले मनोबल उत्तम असणार आहे. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीला आपली अनेक कामे तसेच आपली दैनंदिन कामे तुम्ही विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आपले मनोबल उत्तम राहील. सप्ताहाच्या मध्ये आपल्याला जुने मित्रमैत्रिणीबरोबर सुसंवाद साधता येईल. प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. आगामी सप्ताहात आपण प्रवास शक्यतो सप्ताहाच्या पूर्वार्धात करावेत. सप्ताहाचा शेवट हा आपल्याला काहीसा खर्चिक राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. सप्ताहाच्या शेवटी आपली कामे रखडण्याची शक्यता आहे.
अनु. दि. १४ ते १७
तुला : दैनंदिन कामात सुयश
आगामी सप्ताह हा आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. आगामी सप्ताहातआपण आपली दैनंदिन कामे विनासायास पूर्ण करु शकणार आहात. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आपले नोकरीतील महत्त्वाच्या गाठीभेटींचे नियोजन आपण या सप्ताहात करु शकता. तसेच व्यवसायातील तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत व आपल्याला व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार या सप्ताहात पूर्ण करता येणार आहेत. आगामी संपूर्ण सप्ताह आपणाला प्रवासाकरिता अनुकूल असणार आहे. सार्वजनिक कामात तुम्हाला मानसन्मान लाभेल.
अनु. दि. १४ ते २०
वृश्चिक : सप्ताहाची सुरुवात निराशाजनक
आगामी सप्ताहाची सुरुवात ही आपणाला निराशाजनक असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला आरोग्याच्या काही तक्रारी राहतील. आपले मनोबल कमी राहील. काहीजणांना सप्ताहाच्या सुरुवातीला काही मानसिक चिंता सतावणार आहेत तर काहींना कसलेतरी भावनिक दडपण राहण्याची शक्यता आहे. आगामी सप्ताहात आपण कोणतेही आर्थिक धाडस करण्याचे टाळावे. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र आपले आरोग्य सुधारेल. आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात आपण प्रवासाचे नियोजन करू शकता. आर्थिक धाडस मात्र कटाक्षाने टाळावे.
अनु. दि. १६ ते २०
धनु : मानसिक अस्वस्थता
आगामी सप्ताहात आपल्याला मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्यता आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. आगामी सप्ताहात आपली नियोजित कामे रखडण्याची शक्यता आहे. आपले मनोबल कमी राहील. प्रवास करताना व वाहने चालविताना आपण विशेष काळजी व खबरदारी घ्यावी. आगामी सप्ताहात आपल्याला दैनंदिन कामात काही अडचणी जाणवणार आहेत. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. काहींचा मनोरंजनाकडे तर काहींचा आराम करण्याकडे कल असणार आहे. आगामी सप्ताहात आपण कोणत्याही प्रकारचे धाडस करण्याचे टाळावे. तसेच आगामी सप्ताहात आपण आर्थिक कामे सावधानतेने करावीत..
अनु. दि. १४,१५,१८,१९,२०
मकर : कामाचा ताण राहील.
आगामी सप्ताहात आपणाला काही अतिरिक्त कामाचा ताण राहणार आहे. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला आरोग्य जपावे लागणार आहे. आपल्याला दवाखान्यात जावे लागण्याची शक्यता आहे. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीलाच काही अनावश्यक खर्च राहणार आहेत. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आगामी सप्ताहात आपली कामे रखडण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्ये एक दोन दिवस आपल्याला उत्साही वाटेल मात्र आपल्यावर कामाचा ताण असल्याने तणाव राहणार आहेत. आगामी सप्ताहात आपण प्रवास करण्याचे टाळावे तसेच वाहने चालविताना आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
अनु.दि. १६,१७
कुंभ : आरोग्य जपावे.
आगामी सप्ताहात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आपण आपले आरोग्य जपावे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडेही आपण दुर्लक्ष करू नये. सप्ताहाच्या सुरुवातीला आपले आरोग्य बरे राहील. मात्र आगामी सप्ताहाच्या मध्ये एक दोन दिवस आपल्याला आरोग्याच्या तक्रारी सतावणार आहेत. आगामी सप्ताहात आपणाला काही अनावश्यक खर्च संभवतात. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. त्यामुळे आगामी सप्ताहात आपली बरीचशी कामे रखडण्याची शक्यता आहे. आगामी सप्ताहात काहींचा धार्मिक कामाकडे कल राहील. आगामी सप्ताहात आपण प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
अनु. दि. १४,१५,१८,१९,२०
मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल.
आगामी सप्ताह हा आपल्याला मानसिक प्रसन्नता व आनंद देणारा असणार आहे. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीला आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीला आपण आपली नोकरी, व्यवसायातील कामे मार्गी लावू शकणार आहात. आपल्यामध्ये नवीन उमेद निर्माण होईल. आपला उत्साह विशेष असणार आहे. सार्वजनिक कामात तुम्ही उत्साहाने सहभागी होणार आहात. तुम्हाला मानसन्मान व प्रतिष्ठा मिळेल. प्रवासाकरिता आगामी सप्ताहाचा पूर्वार्ध आपणाला विशेष अनुकूल असणार आहे. सप्ताहाच्या शेवटी आपला करमणुकीकडे कल राहील.
अनु. दि. १४ ते १७