निर्मल कुमार सुराणांचे प्रतिपादन
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ, निवडणुकीचे योग्य व्यवस्थापन केले जाईल : निर्मल कुमार सुराणा
महायुतीच्या प्रचारात, निवडणुकीच्या नियोजनासाठी लोकसभा प्रबंधन समिती चांगले कामं करेल असा विश्वास भा ज पा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक सह प्रभारी निर्मल कुमार सुराणा यांनी व्यक्त केला
महायुतीचे सातारा लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टीच्या सातारा लोकसभा प्रबंधन समितीची बैठक हॉटेल लेक व्ह्यू सातारा येथे संम्पन्न झाली
भा ज पा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक सह प्रभारी निर्मल कुमार सुराणा यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या बैठकीसाठी, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, विनीतजी कुबेर, ऍड डी जी बनकर तसेच सातारा लोकसभा निवडणूक प्रबंधन समितीचे सदस्य उपस्थित होते
भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी, प्रत्येक लोकसभा मतदार संघासाठी एक निवडणूक प्रबंधन समिती तयार केली आहे, या समितीमध्ये कॉल सेंटर प्रचार सामग्री व्यवस्था वाहन व्यवस्था सोशल मीडिया आणि हायटेक अभियान प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन, प्रिंट- इलेक्ट्रॉनिक आणि लोकल यूट्यूब चैनल मीडिया व्यवस्थापन,प्रचार आणि इतर साहित्य जुळवणे एकत्र करणे काही कायदेशीर बाबींचे सल्ले निवडणुकी मधील हिशोब व्यवस्था पाहणे, स्टार प्रचारकांचे दौरे आयोजित करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बूथ मधील प्रचाराचे नियोजन करणे, यासाठी पूर्ण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समित्या तयार केले आहेत, या समित्या लोकसभा स्तरावर आणि विधानसभा स्तरावर गेले दोन महिने काम करत आहेत, त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेणे आणि पुढील कामासाठी सूचना देण्यासाठी आजची ही महत्त्वाची बैठक आयोजित केली होती
जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी सर्वांचे स्वागत केले आणि सातारा जिल्ह्यातील भाजपा संघटना आणि निवडणूक प्रबंधन समितीची माहिती दिली,प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी बूथ रचना चार्ज केल्याने निवडणूक सुकर होईल आणि याचे महत्व सांगितले,ऍड डी जी बनकर यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत महायुती मधील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधला जाईल आणि सर्वजण मिळून या निवडणुकीत विजय संपादन करू अशी ग्वाही दिली
पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्यावरील इतर जबाबदाऱ्या बरोबरच आपला बूथ सक्षम करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता बोलून दाखवली, प्रत्येकाने आपल्या बूथ वरील महायुतीच्या सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करावे, काही कारणाने जी नाराज असतील त्यांना सुद्धा बरोबर घेऊन त्यांची नाराजी दूर करावी आणि आपल्या बूथ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कमळ चिन्ह यांचा प्रचार करावा अशा सूचना केल्या
भा ज पा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक सह प्रभारी निर्मल कुमार सुराणा यांनी सर्व समिती सदस्यांशी वैयक्तिक बोलून कामाची माहिती घेतली,कामं करताना येणाऱ्या अडचणी विचारून त्यातून मार्ग कसा काढायचा या बाबत मार्गदर्शन केले आणि येत्या पंधरा दिवसात करायच्या कामाबाबत सूचना केल्या आणि ज्या जोमाने कार्यकर्ते पदाधिकारी कामं करत आहेत त्या मुळे सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित होईल असे सांगून निवडणूक प्रबंधन समितीच्या सदस्यांच्या कामाचे कौतुक केले