शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा..!
मर्दानी खेळ,पोवाडे आणि भगव्या वातावरणात नाडे येथे शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा..!
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीने शिवप्रेमी मध्ये चैतन्य..!
नवारस्ता/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पाटण शहरा सहीत संपूर्ण तालुक्यात भगव्या वातावरणात साजरी करण्यात आली.
पारंपरिक वेशभूषा,चित्तथरारक मर्दानी खेळ आकर्षक भगवे वातावरण अशा शिवमय वातावरणात पाटण तालुक्यातील नाडे नवारस्ता येथील पहिल्या शिवतीर्थावर राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा करणेत आला.
मुंबई गेट वे ऑफ इंडिया,छ. शिवाजी पार्क,शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथील छत्रपती शिवरायांचे तेजस्वी व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा याच प्रांजळ भावनेतून नव्या पिढीबरोबरच देशी-परदेशी पर्यटकांना महाराजांच्या विचार व कार्याची आठवण करून देत असतात. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी दिलेला जनसेवेचा हा वारसा जपताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारुढ पुतळा पाटण तालुक्यातील नवारस्ता येथे उभारण्याचा संकल्प लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला होता. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रयत्न करून अवघ्या काही महिन्यातच पाटण तालुक्यात नाडे नवारस्ता येथे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिलाच अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. येथील आकर्षक शिवतीर्थावर शिवजयंती चा पहिलाच उत्सव दस्तुरखुद्द पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्याच उपस्थित मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.हा उत्सव श्रीमती विजयादेवी देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई,जयराज देसाई,पाटण तालुका शिवस्मारक समितीचे उपाध्यक्ष विजय पवार आणि समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित संपन्न झाला.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय,जय भवानी जय शिवाजी,हर हर महादेव अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.विविध मर्दानी चित्तथरारक खेळ,पोवाडे,भगव्या पथका,रस्त्याच्या दुतर्फा काढलेल्या आकर्षक रांगोळ्या यामुळे संपूर्ण परिसर भगवेमय झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय,जय भवानी जय शिवाजी,हर हर महादेव अशा घोषणां देत शिवभक्त या दिमाखदार उत्सवात सहभागी झाले होते.
सकाळी १०वाजता नाडे येथील शिवतीर्थावर पालकमंत्री ना शंभूराज देसाई,श्रीमती विजयादेवी देसाई,रविराज देसाई यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यानंतर जयंती सोहळयाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना पोलीस दल व पोलीस बँडच्यावतीने मानवंदना देण्यात आली.
दरम्यान यावेळी श्री छावा युवा मंच अतित जि.सातारा यांचेवतीने शिवकालीन युध्दकला दांडपट्टा व स्वसंरक्षण यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात आली, भारतीय हिंदूरत्न पुरस्कार विजेते शाहिर शुभम विभुते यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवन कार्यावरील अंगावर शहारे आणणाऱ्या शिव पोवाडयाचे सादरीकरण करण्यात आले.सर्वांचे पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
तर शिवज्योत घेऊन जाणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
——–
:नेटक्या नियोजनाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक..!
दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या कार्यक्रमाला तब्बल दोन तास उपस्थित राहून शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा आनंद द्विगुणित केला शेवटी उपस्थित सर्वांना संबोधित केले यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा उभारला.अगदी हुबेहूब त्याच अश्वारूढ पुतळ्याची पहिली प्रतिकृती आपणाला माझ्या पाटण मतदार संघाच्या प्रवेशद्वारावर उभारण्याची संधी मिळाली.पाटण तालुक्यातील हे पहिले शिवतीर्थ उभारण्याचे भाग्य मला मिळाल्याची भावना व्यक्त करून कार्यक्रमाच्या नेटक्या नियोजनाचे कौतुक केले.