राशीभविष्य
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, माघ कृष्ण षष्ठी स. ७ वा. ३३ मि. पर्यंत नंतर सप्तमी, छ. शिवाजी महाराज जयंती ( तारखेप्रमाणे), बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२५, चंद्र – तुला राशीत, नक्षत्र – स्वाती स. १० वा. ४० मि. पर्यंत नंतर विशाखा, सुर्योदय- सकाळी ०७ वा. ०६ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ३९ मि.
नमस्कार आज चंद्र तुला राशीत रहाणार आहे. आज स. ८ पर्यंत चांगला आहे. आज चंद्र – मंगळ त्रिकोणयोग व चंद्र – शनि त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर वृषभ, वृश्चिक व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आजचा दिवस आपणाला अनेकदृष्टींने अनुकूल असणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील.
वृषभ : मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आरोग्य जपावे. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत.
मिथुन : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक व शारीरिक दोन्ही आरोग्य उत्तम असणार आहेत. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस विशेष लाभदायक जाणार आहे. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कर्क : मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील कामांना आज तुम्ही प्राधान्य देणार आहात. मनोबल उत्तम असणार आहे. नोकरी, व्यवसायात आज उत्तम स्थिती असणार आहे. प्रवसाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.
सिंह : मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासपूर्वक आज तुम्ही कार्यरत रहाणार आहात. आरोग्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्नरत रहाणार आहात. आर्थिक लाभ होतील.
कन्या : कौटुंबिक जीवनात सुसंवादी वातावरण राहणार आहे. आज तुमची मानसिकता सकारात्मक असणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे.
तुला : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. तुमचे मन आज आनंदी वआशावादी असणार आहे. सौख्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. स्कारात्मकपणे कार्यरत राहणार आहात.
वृश्चिक : दैनंदिन कामात आज तुमचे लक्ष लागणार नाही. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. मनोबल कमी असणार आहे. वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवावीत.
धनु : व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहेत. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक लाभ होतील.
मकर : सार्वजनिक क्षेत्रात आज तुमचा प्रभाव असणार आहे. तुमचा आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिकता सकारात्मक राहील.
कुंभ : आज तुम्ही विशेष जिद्दीने कार्यरत राहणार आहात. काहींना गुरुकृपा लाभेल. काहींना एखाद्या तीर्थक्षेत्री भेट देण्याचा योग येईल. प्रवासातून आनंद मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
मीन : मानसिक चिंता सतावणार आहेत. आज तुम्हाला एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. अनावश्यक मनस्ताप संभवतो. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.
आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054