पुण्यात प्रचार झाला विस्कळीत
पुण्यात दुसऱ्या दिवशीही
मुसळधार पाऊस
प्रचार झाला विस्कळीत
पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशी आज शनिवारी दुपारनंतर अवकाळी पावसाच्या जोरदार सरी आल्या. जनजीवन आणि निवडणूक प्रचार दोन्हीही विस्कळीत झाले.
गेले महीनाभर उन्हाळी लाटेत भाजून निघालेल्या पुणेकरांना पावसाने आणलेल्या गारव्यामुळे दिलासा मिळाला. आज (शनिवारी) दुपारी तीन नंतर सुरू झालेला पाऊस संध्याकाळी पाच वाजताही चालूच होता. वादळीवाऱ्यामुळे शहरात दहा ठिकाणी वृक्ष पडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात पाणी साठले. त्याचा मनःस्ताप रहिवाशांना झाला. शहराच्या काही भागात विद्युतपुरवठा तासभर खंडित झाला होता.
राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांवरही पावसाचा परिणाम झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वडगाव शेरी येथील सभा रद्द करण्यात आली. उमेदवारांच्या पदयात्राही रद्द करण्यात आल्या. शहरात दुपारी बारा ते दोन यावेळात कडक उन होते.