दगडूशेठ गणपती मंदिरात दि.२३ ला शहाळे महोत्सव
दगडूशेठ गणपती मंदिरात
दि.२३ ला शहाळे महोत्सव
पूणे – पुष्टिपती विनायक जन्मोत्सवानिमित्त गुरूवार दिनांक २३ मे रोजी दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित केला असून ५हजार शहाळ्यांचा महानैवेद्य गणपतीला दाखवला जाणार आहे.
मंदिरात पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होईल. पहाटे ४ ते ६ स्वराभिषेक कार्यक्रम होणार असून, त्यात डॉक्टर अभिजित कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि श्रेया मयुराज सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी ८ ते १२ गणेश याग होईल, असे मंदिर व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे.