खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचे आवाहन
सण, उत्सव
सभ्यतेने साजरे करावेत
– खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
पुणे – आपले सण आणि उत्सव सभ्यतेने, सुसंस्कृतपणे साजरे करावेत, असे आवाहन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.
रामनवमी निमित्ताने पौड रस्त्यावरील निघालेल्या मिरवणुकीत चाललेला धांगडधिंगा खा.मेधा कुलकर्णी यांनी धडाडीने पुढाकार घेऊन थांबविला. त्यांच्या या कृतीला समर्थन देण्याकरिता महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या वतीने प्रशस्तीपत्र आणि श्री रामाची मूर्ती भेट देऊन खासदार कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला आणि राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सचिन बोधनी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोडसे, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, पुणे चे अध्यक्ष वाङ्मय गोडबोले, रघुनाथ गोडबोले, सुस्मिता गोडबोले, दिलीप देशपांडे, सोहम बोकील आदी उपस्थित होते.
माझा कोणत्याही सणाला, उत्सवाला विरोध नाही, असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले मात्र, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आनंदाने आणि उत्साहाने सण आणि उत्सव साजरे करावेत, आपली वैभवशाली संस्कृती जपली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या या भूमिकेला नागरिकांमधून मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.