पीएमटी चालकांचा सपत्नीक सन्मान
हेमंत रासने यांचा अनोखा उपक्रम
पीएमटी बस चालकांचा सपत्नीक सन्मान
पुणे : पुण्यदशम ‘दस मे बस’ उपक्रमाची तीन वर्षे यशस्वीपणे पार पडल्याच्या निमित्ताने पी एम पी बस चालक आणि वाहकांचे सपत्नीक पाद्यपूजन करत अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये बसची प्रतिकृती असणारा केक कापून पुण्यदशम योजनेचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिक्षणतज्ञ न. म. जोशी, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “स्वस्त, गतिमान, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा सुरक्षित प्रवास पुणेकरांना घडवा, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पुण्यदशम ‘दस मे बस’ योजनेची सुरुवात मी स्थायी समिती अध्यक्ष असताना करण्यात आली होती. शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीची कोंडी पार्किंगची समस्या, प्रदूषण, आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास या योजनेमुळे मदत झाली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये जवळपास १ कोटी प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला.
यावेळी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक सुलोचना कोंढरे, अजय खेडेकर, सम्राट थोरात, विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, . गणेश बिडकर, राजेश येनपुरे, अर्चना पाटील, गायत्री खडके,योगेश समेळ, मनीषा लडकत उपस्थित होते.