अनिल देसाई यांचा धैर्यशिल कदम यांना सल्ला
मयताच्या टाळुवरील लोणी खाणार्या आमदारासाठी भाजपला मध्ये आणू नका
अनिल देसाई यांचा धैर्यशिल कदम यांना सल्ला
सातारा ः जयकुमार गोरे आणि धैर्यशील कदम तुम्ही काँग्रेसमध्ये असताना जे उद्योग केले ते उद्योग आता भाजपमध्ये सुरु आहेत. त्याबाबतच्या चर्चा पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचत आहेत. छ. श्री. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीपासून जयकुमार गोरे आणि तुम्ही काय काय उद्योग केले याचे सर्व पुरावे उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांकडे आहेत. काही दिवसांपुर्वी सातार्यात आलेल्या खा. मेधा कुलकर्णी यांच्याकडेही ते पुरावे पोहचवण्याचे काम तुमच्यातीलच काही जणांनी केले आहे याची जाण ठेवा. अन्यथा तुम्हाला कोठेचे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. धैर्यशील कदम मयताच्या टाळुवरील लोणी खाणार्या आमदारासाठी तुम्ही भाजपा या पक्षाला मध्ये आणु नका, असा सल्ला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी एक प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिध्दिपत्रकात म्हटले आहे, आ. जयकुमार गोरे यांनी माझ्या संदर्भात केलेल्या व्यक्तव्याचा खुलासा दहिवडी येथे पत्रकार परिषदेत मी केला होता. पत्रकार परिषदेत मी भाजपबाबत कोणतेही भाष्य केेले नव्हते. असे असताना धैर्यशिल कदम यांना माझ्या व्यक्तव्याबाबत का वेदना झाल्या हे समजुन येत नाही. धैर्यशील कदम यांनी प्रथम त्यांच्याच गावची पुसेसावळी व वांगी-गोरेगांव ग्रामपंचयत कोणाकडे आहे हे अगोदर तपासावे. लोकसभेला उदयनराजे भोसले यांच्या लहान सहान कार्यकर्त्यांनी काम केले असे तुम्ही म्हणता मात्र माझा त्याबाबत कोणताच आक्षेप नव्हता. मात्र जयकुमार गोरे यांनी काम केले नाही, उलट सातार्याची जागा उदयनराजे भोसले यांच्यासाठी अवघड आहे असे पक्षश्रेष्ठींना सांगत होते याचा खुलासा धैयशिल कदम तुम्ही का केला नाही? आम्ही भाजपमध्ये होतो तेव्हा आम्हाला संघटनेची विविध पदे मिळाली त्यावेळी तुम्ही व जयकुमार गोरे भाजपामध्ये नव्हता. तुम्ही दोघे काँग्रेसमध्ये असताना जे उद्योग केले तेच आता तुमच्या पक्षात सुरु केले आहे. त्यावेळी मी भाजपामधुनच जिल्हा परिषद निवडणुक जिंकलो त्यामुळे मयताच्या टाळुवरील लोणी खाणार्या आमदारासाठी तुम्ही भाजपला मध्ये घेऊ नका. माझा पक्ष कोणता विचारयचा तुम्हाला अधिकार नाही. मी आता उघडच तुतारीचे काम केले आहे. तुम्ही व जयकुमार गोरे यांनी लपुन छपुन तुतारीचे काम केले हे जगजाहिर आहे.
सातारा जिल्ह्यातील लहान सहान कार्यकर्ते उदयनराजे यांचे काम करत असताना जयकुमार गोरे काय करत होते हे कार्यकर्त्यांना चांगलेच माहित आहे. जयकुमार गोरे यांनी किती सभा घेतल्या हे ही जगजाहिर आहे. माझा कोणताही बोलवता धनी नाही यापुढे जर बोललात दोघांच्या पापाचा घडा भरण्याइतपत माझ्याकडे माहिती आहे हे विसरु नका. कोण कोणाला जागा दाखवेल हे योग्य वेळ दाखवुन देईल, असा इशाराही अनिल देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
——————
उदयनराजे, शिवेंद्रसिंह राजेंचा फोटो का नाही?
आज तुम्ही पत्रकारांना दाखवण्यासाठी जयकुमार गोरे यांचा फोटो पक्ष कार्यालयात लावला मात्र खासदार असलेल्या श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा फोटो का लावला नाही याचे उत्तर जिल्ह्यातील नागरिकांना द्या आणि मगच दुसर्यांसाठी पत्रकार परिषदा घेऊन प्रसिध्दी पत्रके काढा, असा सल्ला अनिल देसाई यांनी दिला.