श्वेतपत्रिका काढा : मोहिते


फेरीवाला सर्वेक्षणाची श्वेतपत्रिका काढा

दिपक मोहिते

अध्यक्ष पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्य

Advertisement

२०१४ साली केलेल्या संपूर्ण सर्वेक्षण करण्यात आलेल्या फेरीवाला सर्वेक्षणाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी अध्यक्ष व पालकत्व असलेल्या महापालिका आयुक्तांना करण्यात आले आहे.
२०१४ साली TVC व प्रशासन यांनी फेरीवाला सर्वेक्षण प्रक्रियेत १५ क्षेत्रीय कार्यालय मिळुन किती फॉर्म छापले होते.
२०१४ ते २०२४ ह्या १० वर्षांच्या काळात आपण किती फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे.
२०१४ ते २०२४ ह्या काळात किती फेरीवाल्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे.
ह्या १० वर्षात किती फेरीवाल्यांना प्रमाणपत्र देणे बाकी आहे.
किती फेरीवाल्यांचे पुनर्वसन हे अधिकृत झोनमध्ये अधिकृत रित्या केले आहे
किती फेरीवाल्यांचे पुनर्वसन हे बाकी आहे व का ?
किती फेरीवाल्यांना दैनंदिन शुल्क आकारणी चालू आहे
किती फेरीवाल्यांना दैनंदिन शुल्क आकारणी चालू नाही व का ?
आपल्या कार्यप्रणाली नुसार किती फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले आहे.
किती फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले नाही व का?
जुन्या पुस्तकी परवाना धारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण झाले आहे का ?
वारसा प्रकरणे व ट्रान्स्फर प्रकरणे यांची स्कुटीनी करून ही प्रकरणे किती निकाली काढली , किती प्रलंबित आहेत व का यांची आकडेवारी द्यावी
सर्वेक्षण प्रक्रियेत १०० चा फॉर्म घेऊन सर्वेक्षण प्रक्रिया अर्धवट आहे त्यांना व शुल्क मागणी अर्जाना शेवटची अखेरची मुदत देउन ही प्रकरणे पुर्ण करावीत .
पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्रि नियमन) अधिनियम २०१४ कायद्याची अंमलबजावणी झाली आहे का त्याची टक्केवारी
म्हणजे अधिकृत व अनधिकृत यांची ओळख पटने सोपे होईल
त्यानुसार झोनमध्ये अधिकृत फेरीवाल्यांचा नावाचा बोर्ड लावावा , म्हणजे प्रशासन,नागरीकांना व माध्यमांना ओळखने सोपे होईल, सरसकट अनधिकृत चा ठपका फेरीवाल्यांवर ठेवला जाणार नाही
अशा मागणीचे पत्र नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया व पथ विक्रेता एकता समिती यांच्या वतीने आयुक्तांना दिले आहे ही माहिती उपाध्यक्ष सुनील भादेकर यांनी दिली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!