दंततपासणी शिबीर संपन्न


 

स्वच्छ मुख अभियान अंतर्गत दंततपासणी शिबीर संपन्न
सातारा दि.16 (जिमाका): शासनाच्या “स्वच्छ मुख अभियान” अंतर्गत दिनांक 15 जुलै, 2024 रोजी Oral Surgery Day साजरा करण्यात आला. या अनुषंगाने “युनियन पब्लिक स्कूल, सातारा” येथे दंततपासणी शिबीराचे आयोजन “छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा येथील अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
डॉ. ऐश्वर्या खाचणे सहायक प्राध्यापक दंतशास्त्रविभाग यांनी व्याख्यान दिले. तसेच डॉ. निलम सोनावणे, डॉ. सोनल धनवडे, व डॉ. जगदीश चांडक यांनी दंततपासणी करून दातांची निगा कशी राखावी या बद्दल माहिती दिली.
उपरोक्त शिबीराच्या आयोजनाकरीता “छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा येथील डॉ. भारती दासवानी, डॉ. प्रितीश राऊत, तसेच “युनियन पब्लिक स्कूल, सातारा” येथील मुख्याध्यापिका श्रीमती वंदना घाडगे, उपशिक्षक विलासराव साळवे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
00000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!