आजचा दिवस : राशिफल
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, आषाढ शुक्ल एकादशी, देवशयनी एकादशी, मोहरम, बुधवार, दि. १७ जुलै २०२४, चंद्र – वृश्चिक राशीत, नक्षत्र – अनुराधा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. १२ मि. , सुर्यास्त- सायं. १९ वा. १८ मि.
नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत रहाणार आहे. आजचा दिवस करिदिन वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – गुरु प्रतियोग व चंद्र – शुक्र त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, मिथुन व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आज तुम्ही आराम करणार आहात. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाईल. वादविवाद टाळावेत. खर्च वाढणार आहेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. रखडलेली कामे मार्गी लावणार आहात.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी असल्याने दैनंदिन कामे नकोशी होतील. कामाचा कंटाळा कराल. प्रवास आज नकोत.
कर्क : मुलामुलींकरिता वेळ देणार आहात. काहींना अनपेक्षितपणे प्रियजन भेटणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.
सिंह : आज तुमचे मन अत्यन्त आनंदी व आशावादी राहणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. घरातील कामांना प्राधान्य देणार आहात.
कन्या : नातेवाईकांना भेटण्यास जाल. जुने मित्रमैत्रिणी भेटतील. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणार आहात. प्रवासास अनुकूलता आहे.
तुळ : आजचा दिवस आपण कौटुंबिक प्रियजनासमवेत व्यतीत करणार आहात. मनोबल उत्तम राहील. अनेकांशी सुसंवाद साधाल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. मनोबल उत्तम असणार आहे.
वृश्चिक : आज तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
धनु : नको त्या गोष्टीवर तुमचा वेळ खर्च होईल. तुमची चिडचिड होणार आहे. कामे रखडतील. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. काहींना एखादी चिंता लागून राहील.
मकर : आज तुम्ही प्रियजनाकरिता वेळ देणार आहात. मनोबल उत्तम राहील. जुन्या आठवणींमध्ये रमणार आहात. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहे.
कुंभ : उत्साही रहाल. अनेक कामात यश मिळवणार आहात. आनंदी व आशावादी रहाल. मानसिक सौख्य व समाधान लाभणार आहे. काहींना मानसन्मान लाभेल. प्रवासात अनुकूलता लाभेल.
मीन : मनोबल वाढेल. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपणार आहे. रखडलेल्या कामात सुयश मिळवाल. आज एखादी आनंददायी घटना घडेल. अनपेक्षित प्रवास संभवतात.
आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४