धोम धरण पाणी विसर्ग सूचना
धोम धरण पाणी विसर्ग सूचना
धोम धरणाचे पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी विद्युत ग्रह तसेच सांडव्यावरून उद्या (दि.28.7.2024) सायंकाळी 4.00 वा. धरणातून अंदाजे 4000 क्युसेक्स विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडला जाऊ शकतो. पावसाचे प्रमाण व येव्यानुसार त्यामध्ये कपात अथवा वाढ करणेत येईल. याबाबत उद्या सकाळी आठ वाजता पावसाचे प्रमाण व धरणात येत असलेली पाण्याची आवक याचा आढावा घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार पाणी सोडणे बाबतची आगाऊ सूचना देण्यात येईल.
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.