आजचा दिवस राशिभविष्य
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, आषाढ अमावस्या, दर्श अमावस्या, दिपपूजन, रविवार, दि. ४ ऑगस्ट २०२४, चंद्र – कर्क राशीत, नक्षत्र – पुष्य दुपारी १ वा. २६ मि. पर्यंत नंतर आश्लेषा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. १८ मि. , सुर्यास्त- सायं. १९ वा. ११ मि.
नमस्कार आज चंद्र कर्क राशीत रहाणार आहे. आजचा दिवस अमावस्या वर्ज्य दिवस आहे. आज रवि – चंद्र युतीयोग, चंद्र – मंगळ लाभयोग व चंद्र – गुरु लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक धनु, मकर व मीन या राशींना अनुकूल तर सिंह, धनु व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्ही विशेष आशावादीपणे कार्यरत राहणार आहात. सार्वजनिक व सामाजिक कामात सहभागी होणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. समाधानकारक दिवस राहील.
वृषभ : आज काहीजण पिकनिक व सहलींचे आयोजन करतील. प्रवास सुखकर होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. जिद्दीने व चिकाटीने हाती घेतलेले काम पूर्ण करणार आहात.
मिथुन : कौटुंबिक जीवनात आंनदादयी घटना घडेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल. आर्थिक लाभ होतील.
कर्क : आज आपण आपली सर्व कामे विनासायास मार्गी लावणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
सिंह : मनोबल कमी असणार आहे. आज काहींचा आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहीजण धार्मिक कार्यात रममाण होणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
कन्या : जुने मित्र मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रियजनांच्या सहवासात आजचा दिवस आनंदी जाईल. आज आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल उत्तम राहील.
तुला : दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपल्याला आपल्या घरासाठी व घरातील कामांसाठी वेळ देता येणार आहे. तुमचा सर्वत्र प्रभाव दिसून येईल.
वृश्चिक : आज काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देणार आहात.
धनु : मानसिक अस्वस्थता राहील. आज आपल्याला कसलीतरी अनावश्यक चिंता सतावेल. वादविवादात सहभाग टाळावा. शान्त व संयमी राहावे. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. वाहने सावकाश चालवावित.
मकर : वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. तुमचेमनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आनंदी रहाल. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.
कुंभ : काहीजण धार्मिक कामात रमत तर काहीजण करमणुकीसाठी खर्च करणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना विशेष सावधानता ठेवावी.
मीन : प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींचे नवीन स्नेहसंबंध जुळतील. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आज आपण आपली सर्व कामे बुद्धिकौशल्याने पूर्ण करणार आहात.
आज रविवार, आज दुपारी ४.३० ते ६ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४