रिक्षा चालकांना गणवेश वाटप
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त
रिक्षा चालकांना गणवेश वाटप
पुणे – भाजपचे नेते उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा मतदारसंघातील १हजार५४ रिक्षा चालकांना गणवेशाच्या कापडाचे वाटप सोमवारी करण्यात आले.
ज्येष्ठ रिक्षा चालक बापू भावे आणि ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे डॉ.केशव क्षीरसागर यांच्या हस्ते गणवेश कापडाचे वाटप करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा भाजप निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी हा कार्यक्रम राबविला. कार्यक्रमाला रिक्षा चालकांनी मोठा प्रतिसाद दिला.
समाजाच्या उपयोगी पडणारे कार्यक्रम राबवा, असा आग्रह देवेंद्रजी फडणवीस यांचा असतो. त्यानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांना बाराही महिने सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांना गणवेशाचे कापड देण्यात आले, असे हेमंत रासने यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. तसेच महायुती सरकारने वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी दर दिवशी आकारण्यात येणारे ५० रुपयांचे विलंब शुल्क रद्द केले, याबद्दल सर्व रिक्षा चालकांच्या वतीने रासने यांनी महायुती सरकारचे आभार मानले.