पुण्यात संततधार
खडकवासला धरण क्षेत्रात
६१ टक्के पाणीसाठा
पुण्यात संततधार
पुणे : गेल्या चार दिवसांपूर्वीपासून शहर आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रात संततधार पाऊस पडत असून ६१ .१2 टक्के पाणीसाठा झाला आहे.
पावसाच्या सरीवर सरी पडत असल्याने शहराचे जनजीवन थंडावले आहे. पथारीवाले, फेरीवाले यांचा धंदा घटला आहे. हॉटेलमधील ग्राहकही कमी झाले आहेत. पावसाळी वातावरणाने सर्दी, खोकला,तापाची साथ पसरती आहे.
खडकवासला धरण क्षेत्रात १७ .६२ टीएमसी साठा झाला आहे. अजून ११ टीएमसी पाण्याची गरज आहे .