राज्यपाल – खा.उदयनराजे सदिच्छा भेट


राज्यपाल  रमेश बैस यांच्याशी राज्याच्या  विषयांवर खा.उदयनराजे यांची सविस्तर चर्चा

महाबळेश्वर

येथे मुक्कामी आलेले राज्यपाल रमेश बैस यांची महाबळेश्वर येथील राजभवन येथे खा.श्री. छ.उदयनराजे भोसले यांनी भेट घेवून, राज्याच्या विकासाच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.  राज्यपाल  रमेश बैस यांना निवेदन देताना राज्याच्या  विषयांवर सविस्तर चर्चा केली.

यामध्ये क्षेत्र महाबळेश्वर मध्ये उगम पावून सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश येथे बंगालच्या सागराला मिळणाऱ्या कृष्णा नदीचे सुशोभिकरण आणि शुध्दीकरण करण्यासाठी नमामी गंगा योजनेच्या धर्तीवर नमामी कृष्णा योजना महाराष्ट्र आणि अन्य राज्यात राबविणे.

बौध्द सर्किट किंवा रामायण सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे, या शिवस्वराज्य सर्किट योजनेमधुन, छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास अधिकाधिक वृध्दींगत करण्या करता तसेच मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याच्या, राजगड, रायगड आणि सातारा या तीन राजधान्यांचा सुचीबध्द आणि समयबध्द विकास करणे, तसेच पानीपत ते तंजावर मधील ऐतिहासिक स्थळांचा आणि परिसराचा सुयोग्य विकास साधणे, जेणेकरुन मराठा साम्राज्याच्या समृध्द इतिहास परंपरेचे
अवलोकनासाठी जगभरातून इतिहासप्रेमी याठिकाणी भेट देतील आणि पर्यटनाला देखिल अधिक चालना मिळेल.

Advertisement

महाबळेश्वर जावळील प्रतापगड सह राज्यातील गडकिल्यांचे संवर्धन करण्यासाठी योजना आखणे, महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासाकरीता स्थापित करण्यात आलेल्या उच्यस्तरीय संनियंत्रण समितीवर, संसद-विधीमंडळ प्रतिनिधींसह, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगराध्यक्षांची नियुक्ती करणे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचा अधिकृत इतिहास भारत सरकारद्वारे प्रसिध्द करण्या करता राज्याने पावले टाकणे या प्रमुख विषयांसह अन्य काही विषयांवर राज्यपाल  रमेश बैस यांच्याशी चर्चा केली.

राज्यपाल महोदय यांनी अत्यंत आस्थेवायीकपणे सविस्तर मांडलेले मुद्दे समजून घेताना, याविषयी राज्यशासनाचे प्रशासन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही करेल असे नमुद केले.
या चर्चेच्या वेळी जितेंद्र खानविलकर, गणेश भोसले, अॅडव्होकेट विनित पाटील, प्रितम कळसकर व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!