राजेंद्र चोरगे यांचे आवाहन
जयहिंद
संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी मध्ये सततच्या पावसामुळे खालचा टप्प्यावर पाणी आले असून 10 अग्नीकुंड पाण्याखाली आहेत.
तसेच वरील टप्प्यावर अंत्यसंस्कार सुरू असून कदाचीत पाऊस वाढला आणि धोम, कण्हेर धरणाचे पाणी सोडण्यात आले तर संपूर्ण कैलास स्मशानभूमी पाण्याखाली जाऊ शकते.
तरी कृपया मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास अगोदर संपर्क करून माहिती घेऊनच कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार साठी मृत देह आणावा ही नम्र विनंती.
तसदी बद्दल क्षमस्व.🙏
संपर्क – जगदीप – 9422603625, बंडू-8208579006
राजेंद्र चोरगे, श्री बालाजी ट्रस्ट सातारा.