पुणे..रेड अलर्ट


पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे
जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
——00000—-

Advertisement

जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी संबंधित उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच मदत व बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या भागात आवश्यक दक्षतेचे उपाय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पुढील ४८ तासात धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी करावी, धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक बंद ठेवावी असे निर्देशही डॉ.दिवसे यांनी दिले आहेत.

—-***

मुळशी धरण

मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून मुळशी धरण जलाशय सकाळी ७ या ७० टक्के क्षमतेने भरले असून आज दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.

नदी पात्रात ,पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.

नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.

—–**

महत्वाची सूचना

वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडलीका नदी पात्रामध्ये १० हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे

-सहाय्यक अभियंता श्रेणी १, खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक २


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!