पुणे:मोबाईल व्हॅनचे लोकार्पण
समर्थ युवा फौंडेशनच्या
दुसऱ्या मोबाईल व्हॅन चे लोकार्पण
पुणे – शहर आणि जिल्ह्यात मोबाईल व्हॅनद्वारे आरोग्य सेवा पुरविण्याचा समर्थ युवा फौंडेशनचा उपक्रम यशस्वी झाला असून, आता त्यांच्या दुसऱ्या मोबाईल व्हॅन चे लोकार्पण उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले.
या प्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, विश्वस्त प्रकाश साहू, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या संचालिका बागेश्री मंथाळकर, माजी आमदार दीपक पायगुडे, डॉक्टर संदीप बुटाला, सचिन पाषाणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सरोज पांडे, राहुल पाखरे, सुनील पांडे आणि वैदेही काळे यांनी केले.
फौंडेशनने एक वर्षापूर्वी पहिली व्हॅन चालू केली. त्याद्वारे ४७हजारहून अधिक तपासण्या करण्यात आल्या. स्तनाचा कर्करोग, छातीचा एक्सरे, रक्त तपासणी, रक्तातील साखर तपासणी, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा अशा चाचण्या विनामूल्य केल्या जात आहेत. दुसरी मोबाईल व्हॅन आल्याने वर्षभरात दोनशे आरोग्य शिबिरे घेण्याचा विचार असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून उपक्रमाला सहाय्य मिळाले आहे.