पी-एज्युकुल डिजीव्हर्सिटी आणि मेटीस एज्यु-व्हेंचर्स दिल्ली करार
पी-एज्युकुल डिजीव्हर्सिटी आणि मेटीस एज्यु-व्हेंचर्स दिल्ली या एड-टेक कंपनीच्या अड्डा-२४/७ या डिजीटल प्लॕटफाॕर्म यांच्यात कंटेंट पार्टनर म्हणून करार संपन्न
गुगलचा सपोर्ट असणारी मेटीस एज्यु-व्हेंचर्स दिल्ली या एड-टेक कंपनीचा अड्डा-२४/७ हा एड-टेक कंपनीचा डिजीटल प्लॕटफाॕर्म भारतभर प्रसिद्ध आहे. अड्डा २४/७ या डिजीटल प्लॕटफाॕर्मवर सध्या विविध परीक्षा आणि कोर्सेससाठी भारतातून चाळीस लाख विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत. पी-एज्युकुल डिजीव्हर्सिटी हा विशेषतः महाराष्ट्रातील काॕमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी डिजीटल कंटेट आणि स्कील अँड व्होकेशनल कोर्सेस देणारा प्लॕटफाॕर्म म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. पी-एज्युकुल डिजीव्हर्सिटीचे चेअरमन असणाऱ्या डाॕ पी. कुलकर्णी सरांच्या पी. कुलकर्णी क्लासेसच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षात साठ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेतले आहे.
या दोन कंपनींमध्ये कंटेट पार्टनर म्हणून झालेल्या करारामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आता ३७ प्रकारच्या वेगवेगळ्या विद्याशाखा आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रवेश परीक्षा , प्रोफेशनल करिअर परीक्षा, सर्व राज्य आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षा, राज्य आणि देशातील सर्व नोकरी परीक्षा, सीबीएससी बोर्ड, स्कील अँड व्होकेशनल कोर्सेस यांच्या जवळपास ५०० परीक्षा, बोर्ड परीक्षा आणि कोर्सेसचे डिजीटल प्लॕटफाॕर्म वरुन मार्गदर्शन करण्यात येईल.
प्रत्येक विषय, परीक्षा आणि कोर्सेसचे मार्गदर्शन त्या त्या विषयातील तज्ञ मार्गदर्शक यांचेमार्फत करण्यात येईल. हे मार्गदर्शन लाईव्ह आणि रेकाॕर्डेड स्वरुपात असे दोन्हीही असेल. स्टडी मटेरिअल, टेस्ट सिरीज, डीपीपी, डीएसएस, कौंसिलींग, इ. गोष्टी फिजीकल आणि डिजीटल स्वरुपात पुरवण्यात येईल अशी माहिती पी-एज्युकुल चे चेअरमन डाॕ पी. कुलकर्णी आणि मेटीस एज्यु-व्हेंचर्स दिल्ली या एड-टेक कंपनीच्या अड्डा-२४/७ चे सीओई सौरभ बन्सल आणि सीईओ अजय नागर यांनी करारावेळी ही माहिती दिली.
पी-एज्युकुल चे आयटी डायरेक्टर डाॕ हर्षद सांगळे आणि अड्डा २४/७ चे नॕशनल हेड आलोक दिक्षीत हे करारावेळी दिल्ली येथे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी आय टी जेईई, नीट, सीईटी, सीए, सीएस, आईएस परीक्षा, सर्व राज्य आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षा, राज्य आणि देशातील परीक्षा यामध्ये आय युपीएससी, एमपीएससी, सीयुआयटी, सीक्लॕट, सर्व प्रकारच्या सीईटी, ७वी ते१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी फौंडेशन परीक्षा, बँकींग रिक्रुटमेंट आयबीपीएस परीक्षा, रेल्वे भरती परीक्षा, लाॕ एंट्रन्स, स्टाफ सिलेक्शन कमिशन, अनेक प्रकारचे स्कील अँड व्होकेशन कोर्सेस अशा निरनिराळ्या ५०० परीक्षा आणि कोर्सेचे मार्गदर्शन या डिजीटल प्लॕटफाॕर्म वरुन अत्यंत म्हणजे अत्यंत माफक फी मध्ये अॕप बेस्ड आणि वेब बेस्ड स्वरुपात लाईव्ह आणि रेकाॕर्डेड अशा दोन्ही स्वरुपात करण्यात येईल.
पी-एज्युकुल डिजीव्हर्सिटी आणि दिल्ली येथील मेटीस एज्यु-व्हेंचर्स यांच्या अड्डा-२४/७ या डिजीटल प्लॕटफाॕर्म यांच्यात कंटेंट पार्टनर झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच स्कूल इंटीग्रेटेड प्रोग्राम (एसआयपी) माॕडेल अंतर्गत शाळा, काॕलेज, इंस्टीट्यूटस्, अॕकॕडमीज्, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस यांना सर्व मार्गदर्शन लाईव्ह आणि रेकाॕर्डेड स्वरुपात असे दोन्हीही करण्यात येईल. याशिवाय स्टडी मटेरिअल, टेस्ट सिरीज, डीपीपी, कौंसिलींग, इ. गोष्टी फिजीकल आणि डिजीटल स्वरुपात मार्गदर्शनासह सर्व प्रकारचे टीचिंग एडस् डिजीटल आणि फिजीकल स्वरुपात शिक्षण संस्थांना पुरवण्यात येईल.
एनईपी २०२० ला अनुसरुन वेगवेगळ्या प्रकारचे अनेक स्कील अँड व्होकेशनल कोर्सेसचे मार्गदर्शन अत्यंत माफक फी मध्ये या प्लॕटफाॕर्मवर उपलब्ध आहे.
या परीक्षा आणि कोर्सेसचे मार्गदर्शन नाममात्र फीमध्ये असले तरीसुद्धा विद्यार्थी आणि पालकांना फी भरणे सोईचे जावे यासाठी झिरो ईएमआयची सुविधासुध्दा पुरवण्यात येणार आहे.
या करारामुळे डिजीटल स्वरुपात दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना निश्चित यशाची हमी आणि
वेळ, श्रम, पैसा, प्रवास, सुरक्षितता यांचा लाभ होणार आहे.