पूरग्रस्तां साठी भाजपचे मदत केंद्
पूरग्रस्तां साठी भाजपचे मदत केंद्, हेल्पलाइन
पुणे : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत मदत करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या कार्यालयासह शहरातील सर्व खासदार आणि आमदारांची कार्यालये पुढील आठ दिवस मदत केंद्र म्हणून 24 तास खुली राहातील अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.
शहर कार्यालयाशी नागरिकांना मदतीसाठी 9066515656 किंवा 9928814646 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही घाटे यांनी केले आहे. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने तातडीने ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सर्व आमदार, माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते.