विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हा दौऱ्यावर
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
दिनांक १४ रोजी जिल्हा दौऱ्यावर
पुणे : भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम जाहीर केला असून या अनुषंगाने जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादी निरीक्षक म्हणून ते १४ ऑगस्ट रोजी मोहिमेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
डॉ. पुलकुंडवार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे जिल्हा अध्यक्ष यांच्यासोबत दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. यावेळी डॉ. पुलकुंडवार हे सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व स्वीप समनव्यक यांच्या कामाचाही आढावा घेणार आहेत.
मतदार यादीसंदर्भात नागरिकांना सूचना करावयाच्या असल्यास [email protected] या ईमेलवर पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
0