रक्तदान शिबिरात २४० जणांचा सहभाग
कसबा गणपती मंडळ आणि
दे.ऋ. ब्रा. शिक्षणोत्तेजक संस्था आयोजित
रक्तदान शिबिरात २४० जणांचा सहभाग
पुणे: येथील श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात २४० जणांनी रक्तदान केले. यात ढोल ताशा पथकांमधील युवक युवतींचा सहभाग होता.
शिबीराचा प्रारंभ रविवारी श्री कसबा गणपती मंडपात दीपप्रज्वलनाने करण्यात आला. याप्रसंगी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोतेजक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष जयंत शं. देशपांडे, मुख्य चिटणीस सुनिल पारखी,सह चिटणीस अनिल पानसे, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत वि. शेटे, कार्याध्यक्ष निलेश दि . वकील, कार्यवाह सौ. दिपा प्र. तावरे आणि विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस उपायुक्त एस.एस. गिल यांनी शिबीराला भेट दिली.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षिणोत्तेजक संस्था शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने शंभर जणांनी रक्तदान करावयाचे असा संकल्प केला होता. या संकल्पाला प्रतिसाद मिळाला, असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी आणि मुख्य चिटणीस सुनिल पारखी यांनी सांगितले.