सातारकरांनीसाठी खुष खबर
पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस
१५ तारखेपासून
पुणे : गेली दोन वर्ष प्रतिक्षेत असलेली पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस येत्या १५ सप्टेंबरपासून धावणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर उदघाटन सोहळा सकाळी पावणे बारा वाजता होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गाडीला हिरवा कंदील दाखवतील. या गाडीला ८ डबे असून, ती अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस असेल. गाडीला धारवाड, बेळगाव, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, कराड या स्थानकांवर थांबे असतील. गाडीच्या देखभालीची जबाबदारी हुबळी रेल्वे विभागाची असेल. ही गाडी पुण्यात आल्यानंतर डबे स्वच्छ केले जातील.
वंदे भारत एक्स्प्रेस हुबळी स्थानकावरून पहाटे ५ वाजता सुटेल आणि दुपारी ४ वाजता पुण्याला पोहोचेल. पुण्याहून दुपारी ४.४५ वाजता सुटेल आणि रात्री १.५० वाजता हुबळी येथे पोहोचेल. ही गाडी हुबळी-पुणे प्रवासात कोल्हापूर स्थानकावर थांबेल. मात्र, परतीच्या प्रवासात कोल्हापूरला न जाता थेट मिरज मार्गे धावणार आहे.
या गाडीचा ताशी वेग ११० किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, पुणे ते सातारा विभागात काही स्थानकांदरम्यान गाडी ५५ किलोमीटर वेगाने धावेल.
पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दोन्ही शहरातील दळणवळण, व्यापार वाढेल. शिवाय, कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या स्थानकांवर गाडी थांबणार असल्याने तेथील प्रवाशांचीही सोय होणार आहे.