सनी शिंदे यांची अभिनंदनीय निवड
अ भा मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची कार्यकारिणी जाहीर
सातारा :- डिजिटल मिडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या हक्कासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मीडिया परिषद ही स्वतंत्र शाखा पाच वर्षांपूर्वी सुरू केली. याच्या अधिकृत राज्य कार्यकारिणीच्या निवड जाहीर झाल्या आहेत. यामध्ये राज्याध्यक्षपदी बीडचे अनिल वाघमारे ,राज्य कार्याध्यक्षपदी साताराचे संतोष (सनी) शिंदे यांची तर राज्य उपाध्यक्ष पदी शेगावचे अनिल उंबरकर यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
पिंपरी चिंचवड येथे नुकतीच डिजिटल मीडिया परिषदेची राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. यादरम्यान या निवडी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी जाहीर केल्या.
डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी संतोष (सनी) शिंदे यांची निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,विश्वस्त किरण नाईक व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर संतोष (सनी) शिंदे यांचा सत्कार करताना मुख्य विश्वस्त एस एम देशमुख मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप चव्हाण विश्वस्त शरद पाबळे विभागीय सचिव गणेश मोकाशी राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते